Shreya Maskar
आपल्याकडू असे अनेक वेळा होते की एखाद्या कार्यक्रमासाठी आपण इतरांचे कपडे घालतो किंवा रोजच्या आयुष्यातही एखादा मैत्रीणीचा टॉप आवडला की आपण एक दिवस घालून तो ट्राय करतो. मात्र दुसऱ्यांचे कपडे घातल्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते.
बुरशीजन्य त्वचेचे संक्रमण ओलसर, घामाने भिजलेल्या कपड्यांमध्ये वाढते. एखाद्याला त्वचेचा संसर्ग झालेला असेल आणि तुम्ही त्याचे कपडे वापरलात तर बुरशीचे बीजाणू थेट तुमच्या त्वचेवर हस्तांतरित होतात, ज्यामुळे खाज येणे, त्वचेवर पुरळ येते.
दुसऱ्यांचे कपडे वापरल्याने खरुजाची लागण होऊ शकते. खरुज हा सूक्ष्म, अतिसूक्ष्म माइट्समुळे होतो जे मानवी त्वचेच्या बाह्य थरांमध्ये शिरतात. याचा संसर्ग झाल्यास शरीराला तीव्र खाज सुटते आणि पुरळ येते.
जर तुम्ही एखाद्याचा न धुतलेला कपडा घातला तर शरीरातील उरलेले तेल, घाम , फॅब्रिकमध्ये अडकलेले कपडे धुण्याचे डिटर्जंट यामुळे त्वचेचे मोठे नुकसा होते. त्वचेचा दाह होतो.
कापड वेळोवेळी घाम आणि शरीराचे सुगंध शोषून घेतात, जे नियमित धुतल्यानंतरही टिकून राहू शकतात आणि वैयक्तिक अस्वस्थता निर्माण करतात.
दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या आकाराप्रमाणे तयार केलेले कपडे आपण घातल्यावर त्यात आपल्याला अस्वस्थ वाटते. आत्मविश्वास राहत नाही.
शास्त्रानुसारही, असे सांगितले जाते की, इतरांचे कपडे घालणे टाळा. कारण प्रत्येक कपड्याशी त्या व्यक्तीचा भावनिक ताण जोडलेला असतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.