Shruti Vilas Kadam
२५० ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे करा. त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, थोडे मैदा, मीठ आणि मिरपूड घालून हलके कोटिंग करा.
कढईत तेल गरम करून पनीरचे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करा. तळलेले पनीर बाजूला काढून ठेवा.
कढईत थोडे तेल घेऊन बारीक चिरलेला लसूण, आले, हिरवी मिरची आणि कांद्याचे चौकोनी तुकडे घाला. त्यानंतर शिमला मिरची घालून मोठ्या आचेवर परता.
यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि थोडे व्हिनेगर घाला. चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.
तळलेले कुरकुरीत पनीर कढईत घाला. सॉस पनीरला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मोठ्या आचेवर १-२ मिनिटे परता.
ग्रेव्ही चिली पनीर बनवायचे असल्यास कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून कढईत घाला. थोडे पाणी घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
तयार चिली पनीरवर बारीक चिरलेली स्प्रिंग ओनियन घाला आणि गरमागरम सर्व्ह करा. फ्राइड राइस, नूडल्स किंवा स्टार्टर म्हणून याचा आस्वाद घेता येईल.