- सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
- उद्या मतदान आहे
- सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे
- मतांची टक्केवारी वाढवावी
नागपूरच्या गजानन नगर परिसरात नागपूरहून चंद्रपूरला जाणारी दारुची गाडी पोलिसांनी पकडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे ही गाडी जात असल्याचं सांगितलं जात आहे... नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नरेंद्र नगर पुलाजवळ गजानन नगर येथे गाडीने कारला धडक दिली.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळात नवी मुंबईतील वातावरण चांगलंच तापलंय... काल रात्री अडीच च्या सुमारास भाजपा आणि शिंदे सेनेत हाणामारी झाल्याची घटना घडलीय... त्यावेळी तेथे उपस्थित पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करून दोनही गटांना बाजूला करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय...
अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात चारचाकी गाडीत पैसे आढळले
निवडणुकीत मतदारांना देण्यासाठी पैसे असल्याचा नागरिकांचा आरोप
एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती
पोलिसांनी निवडणूक विभागाकडून तपासणी सुरू
नेमके पैसे कशासाठी आणले याबाबत पोलीस तपास करीत आहेत
पिंपरी चिंचवडच्या रहाटणी फाटामध्ये ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांनी सोशल मिडिया अकाउंट वर लाईव्ह करत भूषण भोईर यांच्या काही कार्यकर्त्यांनी संस्थेच्या नावावर प्रत्येक पाकिटात पाच हजार वाटायचा केला आरोप..दत्ता घाडगे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला असून पोलिस स्थानकात त्यांनी धाव घेतली आहे.
खारघर सेक्टर २० येथे मिळाले पैशाने भरलेल्या बॅगा
निवडणूकीत मतदारांना पैसे वाटण्यासाठी आणल्याचा संशय
खारघर पोलीस ठाण्यात संशयीतावर गुन्हा दाखल
कोणत्या पक्षाचे पैसे होते याबाबत अद्याप माहिती समोर न आल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या कॅश बरोबर कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे प्रचार पत्रक नव्हते
कल्याणच्या भोईरवाडी परिसरात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. निवडणूक प्रचारादरम्यान स्लिप वाटपाच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला.
मकर संक्रांति निमित्त हिंगोलीत महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी एकत्र येत मकर संक्रांतीचा सण साजरा केला आहे यावेळी महिलांनी एकमेकींना तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या तर मंदिराच्या परिसरात या महिलांनी वाण देखील एकमेकींना दिले होते.
धुळ्यात 500 हून अधिक मतदान कार्ड एकाच कार्यकर्त्याकडे आढळून आल्यानंतर एम एम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे सर्व मतदान कार्ड ताब्यात घेऊन, धुळे महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांची भेट घेऊन त्यांच्या टेबलावरच हे सर्व ताब्यात घेतलेले मतदान कार्ड ठेवून या सर्व प्रकाराची माहिती दिली आहे, त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात पोस्ट कार्यालयातून थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचविले जाणारे सीलबंद मतदान कार्ड आले कुठून असा प्रश्न एम आय पक्षाचे पदाधिकारी ईर्षात जहागीरदार यांनी विचारला आहे,
अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे, 87 जागेसाठी तब्बल 661 उमेदवार रिंगणात आहे, अमरावती महानगरपालिका मध्ये एकूण 805 मतदान केंद्र असणार आहे,यामध्ये 6 लाख 47 हजार 180 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे, उद्या होणाऱ्या मतदानासोबतच मतमोजणीची देखील तयारी पूर्ण झाली आहे,16 तारखेला सकाळी दहा वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे,अमरावतीच्या नवसारी परिसरात मतमोजणी होणार आहे, एकूण 14 टेबलवर प्रभाग वाईज मतमोजणी होणार आहे,सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम निकाल घोषित होऊ शकतो,
कराडच्या कृष्णा पुलावरून उडी मारून गोळेश्वर येथील महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मात्र पुलावरून ट्रक घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक शुभम चव्हाण याने जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारत महिलेचा जीव वाचवला.
गोळेश्वर येथील महिला असून तिच्यावर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महापालिकेच्या बीओटी तत्वावर सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणची सरंक्षक भिंत कोसळली.
सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
नवा मोंढा रोडवरील खोब्रागडे नगरमधील घटना.
नागपूर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज..
मतदान केंद्रावरील साहित्य वाटप करण्यास सुरुवात..
नागपूर पालिकेत एकूण 3004 मतदार केंद्र, त्यापैकी 321 संवेदनशील केंद्र घोषित..
पिंपरी - चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरात
पतंग उडवताना इलेक्ट्रिक शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पक्ष,तिकीट वाटप,पक्ष बदल यावर या गाण्यातून केले भाष्य
ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका पीएमपीएल आहेच...
पीएमपीएल पक्षाचे तिकीट आता ऑनलाईनही उपलब्ध आहे..
रांगेत उभा राहायची गरज नाही
पीएमपीएलला प्राधान्य द्या
राजकीय तिकीट नाही पण बसच तिकीट पक्क.. त्यांना आम्ही थेट बसच तिकीट देतो
वेळेवर बसl,आरामदायक प्रवास आणि कमी ताण हे आमचं आश्वासन
पीएमपीएलने निवडा,मत नको,तिकीट पुरे..पक्ष बदल नाही फक्त थांबे बदल.. पीएमपीएल सोबत सुरक्षित प्रवास करा..
सुज्ञ मतदार नागरिकांना आपला योग्य उमेदवार निवडा १५ जानेवारीला तारखेला मतदानाचा हक्क बजावा ....
पुणे महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात असलेल्या आचारसंहिता भंग करणाऱ्यावर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई
महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये १७९ केसेस दाखल करुन त्यामध्ये १ कोटी २३ लाख ९० हजार ५० रुपये इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
यामध्ये अंमली पदार्थ कायदयान्वये १२६ ग्रॅम एमडी, ३ किलो ९४७ ग्रॅम गांजा, ७ किलो २८६ ग्रॅम नार्कोटिस्क पिल्स, २१२ टॅबलेट, ५७ ग्रॅम ७८० मिलीग्रॅम चरस असा एकण २६ लाख ८४ हजार ७२९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चिपळूण मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का
नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झालेल्या माजी आमदार रमेश कदम यांचा पक्षाचा राजीनामा
नगरपंचायत मधील प्रभाव रमेश कदम यांच्या जिव्हारी....पक्षात किंमत नसल्याची व्यक्त केली खंत
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश कदम यांच्या राजीनाम्याने खळबळ
नागपूर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज..
मतदान केंद्रावरील साहित्य वाटप करण्यास सुरुवात..
नागपूर पालिकेत एकूण 3004 मतदार केंद्र, त्यापैकी 321 संवेदनशील केंद्र घोषित..
सवेदनशील असणाऱ्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेराची नजर, आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बळ..
उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी एकूण 16000 कर्मचारी कर्तव्यावर, तर साडेपाच हजार पोलीस कर्मचारी अधिकारी सुरक्षेसाठी तैनात असतील..
नांदेड महापालिकेसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उद्या होणाऱ्या या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 20 प्रभागातील 81 जागेसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शहरातील पाच लाख एक हजार 799 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.600 मतदान केंद्रावर 3400 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आले आहेत. 81 जागेसाठी पार पडत असलेल्या या मतदानाचा निकाल 16 तारखेला लागणार आहे.नांदेड महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता नांदेडकरांना लागली आहे.
नगर पालिका निवडणुकी प्रमाणे राष्ट्रवादी आणि भाजपची युती होऊन शिवसेना बाहेर राहणार असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले आहेत.
रायगडचे मुख्यालय अलिबागमध्ये पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी असे संकेत दिले.
ठाण्यातील प्रभाग क्रमांक ०६ मध्ये पैशाचा पाऊस..
डमी मशीन आणून प्रचार सुरू...
माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी स्थानिक लोकांना पैसे वाटप करण्याचा व्हिडिओ व्हायरल..
जवळच्या लोकांना १००० रुपय तर इतर लोकांना ५०० रुपय देण्याचा आरोप...
शिंदे गटाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे वर्तक नगर पोलिस ठाण्यात दाखल...
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे. तिन्ही शहरांच्या महापालिकेसाठी एकूण वीस प्रभागात 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी तब्बल 381 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी आज मिरजेतील वेअर हाऊस मधून मत पेट्या रवाना करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 527 मतदान केंद्रे करण्यात आलेत. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसाठी एकूण चार लाख 54 हजार 430 मतदार आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदीप गारटकर यांचा प्रवेश आता निश्चित झाला असून पुढील काही दिवसातच अधिकृत प्रवेशाची तारीख जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर गारटकर भाजप मध्ये जाणार असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात फिरत असताना आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी 291 मतदान केंद्रावर होणार मतदान प्रक्रिया पार पडणार असून 2 लाख 45 हजार 929 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी 350 कंट्रोल युनिट तर 1 हजार 400 बॅलेट युनिट असणार आहे.जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी 65 जागांसाठी तब्बल 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.302 पक्षाचे उमेदवार तर 152 अपक्ष उमेदवारांच राजकीय भवितव्य याच ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. दरम्यान उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे 515 पोलीस कर्मचारी आणि 42 अधिकारी तैनात असणार आहे .
शहरातील रमकुबाई नगरातील सासर असलेले भाग्यश्री गौरव चौधरी वय 29 ही विवाहित महिलेने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. भाग्यश्रीच्या आईने संगीता सुनील चौधरी यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात सांगितले की,भाग्यश्रीचा पती गौरवकुमार जगदीश चौधरी वय 35 याचे बऱ्याच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. याबाबत पत्नीचा तीव्र विरोध असल्याने गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता.
पुणे शहरात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 14 पोलीस उपायुक्त, 30 सहाय्यक पोलीस आयुक्त... सात परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस आयुक्त.... 166 पोलीस निरीक्षक...723 सहाय्यक पोलीस निरीक्षक... बारा हजार पाचशे पोलीस उपनिरीक्षक... 3250 होमगार्ड आणि एस आर पी एफ च्या चार तुकड्या असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे....तसेच 100 पेक्षा जास्त संवेदनशील ठिकाणे निश्चित केले असून त्याकरता गुन्हे शाखा आणि इतर शाखांकडील देखील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
मनसेचे अविनाश जाधव यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसंदर्भात हाय कोर्टात याचिका दिली होती. ६७उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. आता ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
महापालिका निवडणूकीआधी ठाकरे बंधू आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भेट घेतली आहे. ठाकरे बंधूंमध्ये मतदानाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
धाराशिवच्या आयुर्वेदिक कॉलेज समोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू
भरधाव वेगाने जाणारी फॉर्च्यूनर गाडी उड्डाणपुलावरील डिव्हायडरला जोरात धडकल्याने घडला अपघात
या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, तर चारजण गंभीर जखमी झाल्याची माहिती
जखमींना धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
अपघातग्रस्त गाडीतील सर्व प्रवासी धाराशिवच्या वाशी तालुक्यातील तेरखेडा गावचे रहिवाशी असल्याची माहिती
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरला धडकली
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली,अमरावती महानगरपालिकाच्या 22 प्रभागांमध्ये 87 जागेसाठी तब्बल 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 6 लाख 77 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे, आज सकाळपासूनच अमरावती शहरातील विविध वितरण केंद्रांवरून ईव्हीएम मशीन्स आणि निवडणूक साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना करण्यास सुरुवात झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि महसूल विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडत आहे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात २ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्सचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे..
नागपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे..
नागपुरात होत असलेल्या निवडणुकीमध्ये राज्याचा मुख्यमंत्री यांचा होमटाऊन असलेल्या नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे यंदा भाजप आपला गड काबीज ठेवण्यात यशस्वी होतं का हे पाहावं लागणार आहे.
नागपूर शहरात 3004 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शहरातील दहा वेगवेगळ्या झोनमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
नागपूर शहरात जवळपास 16000 कर्मचारी या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी असणार आहे. तेच 5000 च्या घरात पोलीस कर्मचारी असणार आहे.
नागपूर शहरात जवळपास 321 संवेदनशील मतदान केंद्र आहे...त्यावर पोलीस आणि निवडणूक विभागाची करडी नजर असणार आहे.
सुमारे 25 लाखाचा घरात मतदार असून 151 उमेदवार निवडून देणार आहे...
मावळच्या धामणे गावातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात तब्बल आठ वर्षांनंतर न्याय मिळाला असून, तळेगाव दाभाडे पोलिसांच्या सखोल व अचूक तपासामुळे वडगाव मावळ सत्र न्यायालयाने दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गुन्हा कितीही नियोजनबद्ध आणि गुन्हेगार कितीही धूर्त असले, तरी कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकत नाही, हे या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे गणेश मोहनराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा मुलांनी शिवाजीराव आगळे व भारतीय जनता पार्टीचे सुरज सातकर यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन तर भारतीय जनता पार्टी कडून एक स्वीकृत नगरसेवकाच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान नवनिर्वाचित नगर परिषदेचा कारभार चोखपणे बजावतील असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी कडून संतोष भेगडे यांची विरोधी पक्ष नेता तर सत्यम गणेश खांडगे यांची पक्ष प्रमोदपदी निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आले...
बोरीवली पूर्व येथील गावकर हॉलमध्ये, बोरीवली ईस्ट–वेस्ट ब्रिजखाली भाजप उमेदवार सीमा किरण शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जेवणाच्या कार्यक्रमात कथितपणे मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमात अनेक नागरिक वाहनांतून येऊन थेट हॉलमध्ये जात होते, काही वेळातच पैसे घेऊन बाहेर पडत होते, कोणतेही जेवण किंवा संवाद न करता हा व्यवहार सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमस्थळी गोंधळ होऊ नये यासाठी काही संशयित व्यक्तींना गेटवर उभे करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
नाशिकच्या मालेगाव मध्ये उद्या होत असलेल्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून,मालेगाव मधील 128 शाळा इमारती मध्ये 609 मतदान केंद्र उभारण्यात आली असून मतदान साहित्याचे वाटप सध्या करण्यास सुरुवात झाली असून मतदान साहित्य घेऊन कर्मचारी ठरवून दिलेल्या बूथ वर जाण्यास सज्ज झाले आहे
माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे समोर आली आहे. एका अज्ञात निर्दयी मातेने किंवा पालकांनी आपल्या अवघ्या ८ ते १० दिवसांच्या चिमुरडीला एका स्कूल बॅगमध्ये भरून नाल्याच्या काठावर बेवारस सोडून दिले. सुदैवाने, हे बाळ जिवंत असून सध्या सुरक्षित आहे.मानेगाव (सडक) परिसरातील उद्घजित पाल सिंग भाटिया यांच्या शेतशिवारातून जाणाऱ्या नाल्याजवळ स्थानिकांना एक काळ्या रंगाची स्कूल बॅग पडलेली दिसली.संशय आल्याने जवळ जाऊन पाहिले असता, त्या बॅगमध्ये एक जिवंत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले.
सासऱ्याची संपत्ती मिळावी, या लालसेपोटी जावयानंचं सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना भंडाऱ्यात समोर आली आहे. मित्राच्या मदतीनंचं जावयानं ही हत्या केल्याप्रकरणी आता कारधा पोलिसांनी आरोपी जावई आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही निर्घृण हत्या भंडाऱ्याच्या कोकणागड इथं घडली. किशोर कंगाले (60) असं मृत सासऱ्याचं नावं आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमध्ये जावई अमित लांजेवार (36) आणि त्याचा मित्र योगेश पाठक (26) यांचा समावेश आहे.
जळगावातील ममुराबाद नाका येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने केलेल्या कारवाईत सोने व चांदीसह २९ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथकाला तपासणीदरम्यान एका कारमध्ये २९ लाख रुपयांची रोकड, तीन किलो चांदी, आठ तोळे सोने आढळून आले
या मुद्देमालाच्या पावत्या संबंधितांकडे नसल्याने पथक व तालुका पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात दिला
मुद्देमाल बहऱ्हाणपूर येथील एका सराफ पेढीचे मालक दामोदरदास गोपालदास श्रॉफ यांच्या मालकीचा असल्याचे कारमधील तिघांनी जबाबात सांगितले आहे.
पंचनामा करून सदर मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आला असून पावत्या सादर केल्यानंतर खात्री करून परत करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती.
कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा फोंडाघाट 15 जानेवारीपासून अवजड वाहनांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 जानेवारीपासून ते 13 फेब्रुवारी पर्यंत हा रस्ता अवजड वाहनांना बंद करण्यात येणार आहे. हलक्या वाहनांना तात्पुरता पर्यायी रस्ता हा फोंडा कनेडी मार्गे कणकवली असा वळवण्यात आला आहे. तर अवजड वाहनांसाठी गगनबावडा घाटमार्गे वाहतूक करावी असा निर्णय शासनाने घेतला आहे.
नागपूर -
- मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील १५ उड्डाणपूल बंद.
- मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता.
- पतंग उडवताना व मांजा पकडण्यासाठी मुले रस्त्यावर उतरण्याने अपघातांचा धोका वाढतो.
- धोका टाळण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय.
अमरावती -
अमरावतीच्या बेलपुरामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आरोप....
पैसे वाटण्याच्या आरोपावरून भाजप आणि युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची.....
आधी रॅली काढण्यावरून युवा स्वाभिमान आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने तर आता युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घराजवळ पैसे वाटल्याचा आरोप..
युवा स्वाभिमान आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल..
कळंबमधील उपजिल्हा रुग्णालय विस्तारीकरणाचे काम रखडले, अद्यापही जागा अनिश्चित
जिल्हाधिकारी व सीईओंकडुन पाहणी होऊनही कामामध्ये कोणतीच हालचाल नाही
धाराशिवच्या कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या 100 खाटांच्या नविन इमारतीसाठी शहरातील दोन जागांची पाहणी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व सिईओ मैनक घोष यांनी करुनही अद्याप जागा निश्चित नाही.
त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारवाढीचे काम रखडले असुन जागा कधी निश्चित होणार असा प्रश्न नागरीकांतुन विचारला जात आहे.
पुणे-
पुणे महानगरपालिकेत उद्या १६३ जागांसाठी होणार मतदान
प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज
पुण्यात ४०११ मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहे
त्यासाठी १३८६२ मतदान यंत्रे आणि ५३२१ कंट्रोल युनिट्स उपलब्ध
मालेगाव-
- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
- 110 पोलिस अधिकारी, तर 2000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
- राज्य राखीव बलाच्या 2 तुकड्या तर 2 दंगा नियंत्रण पथकाचा देखील समावेश
- मतदान प्रक्रिया निर्भीड आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांकडून ऍक्शन प्लान
- मालेगावकरांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे मालेगाव पोलिसांकडून आवाहन
तुळजापूर -
तुळजाभवानी मंदीरात आज सायंकाळी 5 ते 6 वेळेत पुरुषांना प्रवेश बंदी
मकर संक्रांती निमित्त तुळजाभवानी मातेला ओवसण्यासाठी स्थानिक महीला मंदीरात करतात गर्दी
स्थानिक महीला व सुवासिनींना मंदीरात प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य
मकर संक्रांती निमित्त तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदीर संस्थानचा निर्णय
नाशिक -
- नाशिक पोलिसांकडून शहरात रूट मार्च
- जुनं नाशिक पंचवटी सिडको परिसरात पोलिसांचा रूट मार्च
- उद्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज असल्याचा संदेश
- कायद्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी पोलीस रस्त्यावर
- सायरन वाजवत संवेदनशील भागातून केले संचलन
नागपूर -
- विदर्भातील चारही महानगर पालिकेत भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठापणाला
- तर दोन्ही सेना, राष्ट्रवादीची अस्तित्वाची असणार लढाई
- नागपूर चंद्रपूर मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत
- अमरावती, अकोला मध्ये चौरंगी लढत असली तर प्रमुख सामना हा भाजप पुढे काँग्रेससाहित अन्य पक्षांचा असणार आहे
- विदर्भातील चारही महानगर पालिका क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह सर्व पक्षीय दिग्गज नेत्यांच्या झाल्या प्रचारसभा
नागपूर -
- मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी 'आपली बस' सेवा आज पूर्णपणे बंद राहणार
- मनपा निवडणूक कामासाठी 525 आपली बसेसचे व्यवस्था करण्यात आली आहे
- त्यामुळे आज शहर बस सेवा पूर्णपणे बंद राहील तर उद्या मर्यादित मार्गावर 250 बस सुरू राहतील
- 16 जानेवारीपासून शहर बस सेवा आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू होईल
- निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांपर्यंत नियान करण्यासाठी 525 बस उपलब्ध करून देण्यात आले आहेत
- तसेच अरुंद गल्ली आणि दाट वस्तीतील भागांमध्ये पोहोचण्यासाठी 26 लहान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे
- शहर बस सेवा आज पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याने याचा परिणाम सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर होण्याची शक्यता
नाशिक -
- महापालिका निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड
- तर शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप आमदार मैदानात
- भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांचं बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन
- शिंदेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवार आणि उपनेते अजय बोरस्ते यांना शह देण्यासाठी भाजप आमदार प्रचारात उतरल्या
- प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अटीतटीची लढत
अहिल्यानगर -
- शिर्डीत मकर संक्रांतीचा उत्साह, आकर्षक फुलांच्या सजावटीने साई मंदिर सजले
- मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वावर आज शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात भक्तीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे.
- मकर संक्रांत सणानिमित्त नाशिक येथील देणगीदार साईभक्त कैलाश शहा यांच्या देणगीतून साई मंदिर आणि परिसरास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
- या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज हजारो भाविक शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतील..
यवतमाळमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात रोही जखमी, परिसरात भीतीचे वातावरण
यवतमाळच्या पुसद वनविभागा अंतर्गत येणाऱ्या बोरी ईजारा शेत मशिवारात बिबट्याने रोहीवर हल्ला केल्याने त्यात रोही जखमी झाल्याची घटना उघडकीस आले
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पुणे -
पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरण
चतुर्श्रुंगी पोलिसांनी मुंब्रातून एकाला केली अटक
खुम्मा दिलबहादुर शाही (वय ४० रा. कौशल मुंब्रा जि.ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे
खुम्मा शाही हे खेडकर यांच्याकडे नुकताच कामाला ठेवलेल्या हिकमती या तरुणाचे वडील आहेत
पूजा खेडकर यांच्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीतील बंगल्यामध्ये दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हिकमत हा कामाला लागला होता.
पुणे -
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 30 लाख मतदार हक्क गाजवणार
३६०५ मतदान केंद्र असणार; २३५४५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त
पुणे जिल्हा परिषद च्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
जिल्ह्यात 29 लाख 76 हजार 454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदारांना मतदानासाठी तीन हजार सहाशे पाच मतदान केंद्र असतील तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 23 हजार 554 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.