हर्षवर्धन सपकाळ ही निजामाची वैचारिक औलाद
छत्रपती शिवाजी महाराज टिपू सुलतान तुलनेवर आमदार संजय गायकवाड आक्रमक...
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर आमदार संजय गायकवाड यांचे टीकास्त्र.
गडचिरोली, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा देणे ही शासनाची बांधिलकी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान व्यक्त केला.
इगतपुरी स्टेशनवर पुष्पक, हरिद्वार एक्स्प्रेस उभ्या आहेत. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या फास्ट लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलंय.
सातारा जिल्हापरिषद मध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.नेमकी सत्ता कोण स्थापन करणार या वरून तर्क वितरकांना उधाण आले आहे.जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चर्चे बाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भूमिका महत्वाची आहे.या विषयावर आज शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महापशु धन एक्स्पोला सुनेत्रा पवार राहणार उपस्थित
जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर
बीड जिल्ह्याचा बाबत बैठक देखील होण्याची शक्यता
शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आज त्यांच्या पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी दाखल झाले. नुकताच शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ही भेट झाली. भेटीदरम्यान पवार यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर चर्चा झाली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत राजकीय घडामोडींवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी राजकीय परिस्थिती, पक्षातील हालचाली आणि राज्यातील सध्याच्या घडामोडी यावर दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी पवार यांच्या तब्येतीबाबत समाधान व्यक्त केले.
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून या निवडणुकीची प्रतीक्षा होती. महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत दाखल करता येणार आहेत.
या पदांसाठी शुक्रवार, 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता स्व. विलासराव देशमुख सभागृह येथे मतदान होणार आहे. राज्यातील इतर महापालिकांमध्ये महापौर व उपमहापौर निवडले गेले असताना, कोकण आयुक्तांकडून तारीख निश्चित न झाल्याने भिवंडीतील निवडणूक पुढे ढकलली गेली होती. आता निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
- राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सर्व आमदारांची सुनेत्रा पवार घेणार बैठक
- सध्याच्या पक्षाच्या विलिकरण याबाबत करणार चर्चा
- मंगळवारी मुंबई होणार बैठक
सांगली येथे बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी अजितदादांच्या विमान दुर्घटनेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, या प्रकरणी अद्याप डीजीसीएचा अधिकृत अहवाल आलेला नाही. त्यामुळे कोण काय सांगतं, काय बोलतो, याला सध्या कोणताही अर्थ नाही.
अजितदादांच्या जाण्याचे दुःख असल्याचे सांगत त्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचेही स्पष्ट केले. संबंधित यंत्रणांकडून तपास केला जात असून लवकरच अधिकृत अहवाल समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले. अहवाल येईपर्यंत अफवा किंवा तर्कवितर्क न करता संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत–पाकिस्तान सामना संपल्यानंतर पुणे शहरात हुल्लडबाज चाहत्यांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. भारताचा विजय झाल्यास उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांकडून आधीच इशारा देण्यात आला आहे. रस्ते अडवणे, गाड्यांचे सायलेन्सर मोठ्याने वाजवणे, रस्त्यावर फटाके फोडून नागरिकांना त्रास देणे असे प्रकार केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारताच्या विजयानंतर एफ सी रोड परिसरात चाहत्यांकडून सेलिब्रेशन होताना दिसते. मात्र, आनंद साजरा करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बीडच्या अंबिका चौक परिसरातील कॅनल रोड परिसरात एका धावत्या कारमध्ये सेलाटी नावाचा साप निघाल्याने ड्रायव्हरची चांगली धांदल उडवली असून एकच भीतीचं वातावरण निर्माण झाला आणि गाडीतील ड्रायव्हर आणि मालक यांनी थेट गाडी सोडून पळ काढला मात्र त्या ठिकाणी बघ्याची गर्दी जमली आणि या गाडीच्या पाठीमागच्या डिग्गी च्या साईडला एक सैलाटी नावाचा साप पाहायला मिळत असून या प्रकारामुळे ड्रायव्हर चांगलाच घाबरून गेला होता.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला राज्यात अग्रक्रमावर नेण्याचा घेतलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारावी, अशी एकमुखी मागणी आज माळेगावच्या संचालक मंडळाने केली.
नवी मुंबईतील वाशी मधील सिडको ऑडिटोरियम हॉल बाहेर कारला भीषण आग
आगीत गाडी जळून खाक
होंडा सिटी गाडीला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ
अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल आग विझवण्याचा प्रयत्न सुरू
भर रस्त्यात लागलेल्या आगीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
शिरूर शहराच्या कन्या तथा पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे परदेशी यांनी शिरूरकरांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात बालपणाच्या आठवणींना उजाळा देत भावनिक झाल्या.माझ्यावर या मातीत संस्कार झाले. शिरूरची मातीच माझी खरी ओळख आहे,” असे सांगताना त्या आईच्या आठवणीत क्षणभर भावूक झाल्या. बालपण, शिक्षण आणि कुटुंबीयांसोबत घालवलेले दिवस आठवत त्यांनी आईने दिलेले संस्कार आणि कष्टाची शिकवण यांचा विशेष उल्लेख केला. बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड विमानतळावर पोलिसांनी महापौरांना आत जाण्यास केला मज्जाव.
नंतर आमदार कल्याणकरानी महापौराना सोबत नेऊन उपमुख्यमंत्र्यांची करुन दिली भेट.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक
दौंड, पुरंदर, इंदापूर, हवेली तालुक्यातील बैठकीसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसोबत बैठक सुरू
जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद पालघर येथे भव्य शेतकरी मेळावा तसेच जनसंपर्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मेळाव्यात ट्रॅक्टर, पॉवर टिलर, अर्थ ऑगर, ब्रश कटर, कल्टीवेटर आदी आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. टिश्यू कल्चरद्वारे तयार केलेली केळी, विविध रोपे आणि कृषी उत्पादने याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले गेले.
नागपूरहून मुंबईकडे जाणारी संजय ट्रॅव्हल्सची खासगी बस समृद्धी महामार्गावर हर्सूल टोल नाक्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचानक बंद पडली. त्यामुळे बसमधील ४० प्रवाशांचे मोठे हाल झाले. रात्रभर थंडीत कुडकुडत आणि भीतीच्या छायेत प्रवाशांना रस्त्यावरच थांबावे लागले. महिला प्रवाशांची विशेष कुचंबना झाली असून, प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था उपलब्ध नव्हती.
साईचरणी सुवर्ण दान...
59 ग्रॅम वजनाचा 8 लाख 42 हजार रुपये किमतीचा सुवर्ण हार अर्पण...
आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा हार...
बिड येथील साईभक्त धनराज रावसाहेब मुंडे यांच्याकडून सुवर्णदान...
साईबाबा संस्थानच्यावतीने देणगीदार साईभक्ताचा सत्कार...
शिरूर तालुक्यातील रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणुकीनंतर पैशांचा वापर झाल्याची चर्चा सुरु असतानाच आता कारेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरच विजयी मिरवणुकीत नोटांचा वर्षाव केल्याचा व्हिडिओ समोर आलाय
चंद्रपूर महापौर निवडणुकीत ठाकरे सेनेने विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप वंचितचे माजी शहरप्रमुख स्नेहल रामटेके यांनी केला. आम्हाला काँग्रेससोबत जायचे होते. मात्र सेनेने आपल्यापरीने भाजपसोबत युती केली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ठाकरे सेना आणि वंचित यांची निवडणूकपूर्व युती होती. ही युती करताना आम्ही काँग्रेससोबत जाणार, अशी पूर्वकल्पना वंचितने आधीच दिली होती. मात्र तरीही ठाकरे सेनेने मित्रपक्षाशी चर्चा न करता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा आरोप रामटेके यांनी केला. महापौर मतदानाला वंचितचे दोन्ही नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे वंचितने कारवाई करीत चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त केली. त्यानंतर पहिल्यांदाच बरखास्त झालेले शहराध्यक्ष स्नेहल रामटेके माध्यमांपुढे आले.
भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या अगोदर माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
भिवंडी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले आहे
नंदुरबार जिल्ह्यात नॅशनल 752 G हायवेच्या कामावर शेतकऱ्यांचा तीव्र आक्षेप....
वाटवी येथे सर्व शेतकरी एकत्र येत हायवेचे काम रोखले....
जोपर्यंत मोबदला मिळत नाही,तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही शेतकऱ्यांचा ठाम निर्धार....
नॅशनल हायवेवर शेतकरी आणि हायवे ऍक्युरिटीचे अधिकारी आमने सामने...
नवापूर तालुक्यातील भादवड ते विसरवाडी दरम्यानच्या जमिनी महामार्गासाठी अधिग्रहित, मात्र मोबदला अद्याप कागदावरच.....
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि NHAI विभागाला शेतकऱ्यांनी दिले निवेदन....
RFCT LARR Act 2013 नुसार योग्य दराने नुकसानभरपाई देण्याची मागणी....
जमीन हेच उपजीविकेचे साधन, मोबदल्याशिवाय काम करणे अन्यायकारक संतप्त शेतकऱ्यांची प्रतिक्रिया....
सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रशासनाचे आश्वासन, मात्र शेतकरी आंदोलनावर ठाम....
उद्योग मंत्री उदय सामंत यांचं शेतकरी कर्जमाफीबाबत महत्वाचं विधान
कर्जमाफीच्या घोषणेसंदर्भात अगोदरच निर्णय झालेला आहे
ती कधी करायची हे देखील शासनाने ठरवलेलं आहे
आणि त्याचा डेटा कलेक्ट झाला पाहिजे यासाठी ही कार्यवाही सुरू आहे
मी यावर आता बोलत नाही, आता इथे वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहे.. इथे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांच्यावर नंतर बोलेन, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पेच आता अधिकच गडद झाला आहे. भाजप आणि शिंदे सेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असतानाच, आता शिवसेना ठाकरे गटाने या शर्यतीत उडी घेतली आहे. यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे, अंबादास दानवे यांनी मुंगीरीलालचे हसीन सपने पाहू नयेत असा टोला भाजपने लगावला मात्र, जिल्हा परिषदेवर भगवा कोणाचा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुलुंड एलबीएस मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सन समोर मेट्रोचा स्लॅब कोसळला
एक ऑटो रिक्षा आणि चार चाकी गाडीवर स्लॅब कोसळला
याच्यामध्ये दोघेजण जखमी तर काहीजण अडकल्याची माहिती
जालना जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प अर्थातच पोखरा योजनेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या दोन जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सुभाष यशवंतकर आणि आकाश टाक अशी या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत या दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल 64 लाखांचं अनुदान नियमबाह्य अदा केल्याच समोर आलय. जालना जिल्ह्यातल्या जालना बदनापूर भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये जागतिक बँकेच्या सहाय्याने पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे,मात्र गैरव्यवहार झाल्याची तक्रार आल्यानंतर राज्यस्तरीय दक्षता पथकाने तपासणी करून हा अहवाल शासनाला दिला होता,त्यानुसार लेखापरीक्षण अहवालाप्रमाणे 39 लाभधारकांना नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेल्या अनुदान रकमेचे 2 कोटी 46 लाख 51 हजार 815 रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते.
पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आनंदनगर परिसरात व्हॅलेंटाईन डेला एका झाडावर तरुणीचा फोटो आणि काळी बाहुली हळद-कुंकू लावून खिळ्याने ठोकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार भानामतीसारखा असल्याची चर्चा परिसरात सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रकारामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला दरवर्षी देशभरातून लाखो भाविक भेट देतात. मात्र, अपघात किंवा चेंगराचेंगरीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र शासनाने १४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला असून मंदिर परिसरात दगडी सुशोभीकरण, सुरक्षित दर्शनरांगा, पार्किंग आणि स्वच्छतागृहांसह विविध सुविधा उभारण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत.महाशिवरात्रीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी भीमाशंकर येथे प्रत्यक्ष दर्शनासाठी न जाता घरी बसूनच भगवान शंकराची पूजा-अर्चा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे
शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात करण्यात आलं होत
खोकल्याचा त्रास आणि इतर काही व्याधीमुळे शरद पवार गेल्या 5 दिवसांपासून होते रुग्णालयात
शरद पवार यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याने त्याला आज डिस्चार्ज दिला जातो आहे सोबत खासदार सुप्रिया सुळेही आहेत
पुढील काही दिवस पुण्यातील घरी करणार घेणार विश्रांती
सुरज सूर्यभान शिंदे या 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू...
काही लोकांनी सूरजच्या स्कूटीला धडक देऊन त्यालाच बेदम मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप...
साखर कारखान्यांमध्ये ऊस वजनात होणाऱ्या काटामारी बाबत तक्रारी येत असताना त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त यांनी गंभीर दखल घेत साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी त्याचबरोबर ती पारदर्शकता वाढवण्यासाठी ऑनलाईन डिजिटल वजन काटे बसवण्याबाबत आदेश वैद्यमापन विभागाला दिले आहेत.
जळगावच्या भुसावळ शहरातील मटन मार्केटच्या पाठीमागील परिसरात घरफोडी झाली. चोरट्यांनी गॅस कटच्या साह्याने कपाट कापून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिन्यांसह ९५ हजारांचा ऐवज लांबवला.
वैष्णवी हागवणे हुंडाबळी प्रकरणात सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत.वैष्णवीचा मृतदेह भुकूम येथील सासरी १६ मे रोजी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे नमूद झाल्याने आत्महत्या की खून याबाबत संशय निर्माण झाला होता.
लातूर शहरात सलग चौथ्या दिवशी आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे, शहरातील तेल व्यापारी, आणि दोन सराफ व्यापाऱ्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येते आहे, तर सराफ व्यापाऱ्याचे दुकान, आणि घराची झडती आयकर अधिकाऱ्यांकडून सुरू आहे, यात एमआयडीसीतील तेल उद्योग व्यापाऱ्याची देखील आयकर विभागाकडून कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. या धाडीत संबंधित व्यापाऱ्यांच्या बँक खात्याची तपासणी तसेच त्यांच्या मालमत्तेची तपासणी देखील केली जात आहे, एकंदरीत आयकर विभागाला या व्यापारांच्या अघोषित मालमत्ता ,रोकड, दागिने आणि गुंतवणूक असल्याचा संशय आल्याने कलम 132 नुसार प्राप्त अधिकारात आयकर अधिकाराच्या पथकाने बँक लॉकर, ऑफिस निवासस्थान यांची झडती सुरू केली आहे..
सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉटरिचेबल
मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे झिरवळ अडचणी
संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा केला होता खुलासा
तर झिरवळांच्या खाजगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचे चौकशीत आलंय समोर
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील साई गजानन रेसिडेन्सी मध्ये अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये 15 ते 16 मोटरसायकलला अचानक आग लागली असून यावेळी मोटार सायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मध्यरात्री अचानक या लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
आज मनसेची महत्त्वाची बैठक आहे ..
महापालिका निवडणूकीनंतर काही शाखा अध्यक्षांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत बैठक असणार आहे
या बैठकीला मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि महापालिकेत मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार ही असणार आहे ..
तर मनसे नेते अविनाश जाधव , अभिजीत पानसे ही बैठकीला उपस्थिती आहेत ..
मुंबईमध्ये मनसेची पुढची वाटचाल काय असेल या बाबत या बैठकीत चर्चा होणार …
थोड्याच वेळात या बैठकीसाठी नेते मंडळी शिवतीर्थावर पोहचत आहेत
नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके ऍक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळते आहे. नाशिक महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता मोहिमेत महापौर आडके यांनी स्वतः झाडू हातात घेऊन रस्त्याची स्वच्छता केली. महापौरांसह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते
व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगावची बाजारपेठ गुलाबांच्या फुलांनी बहरली आहे. शहरातील फुलांच्या बाजारात लाल, पिवळे, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या विविध गुलाबांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. गुलाबांच्या फुलांसह यंदा विशेष आकर्षक पॅकिंगमध्ये तयार केलेले गुलाबांच्या गुच्छांना मोठी मागणी आहे. मागणी वाढल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत गुलाबांच्या किमतीत सुमारे ८ ते १० टक्क्यांची वाढ झाली
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जनता दरबार घेत आहेत. विविध समस्या सोडवण्यासाठी बारामतीकर सहयोग बंगल्यावर दाखल झाले आहेत. दादा प्रमाणेच वहिनी आमचे प्रश्न सोडवतील असा विश्वास बारामतीकारांना वाटत आहे.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मध्ये शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नवीन संकल्पना आणली आहे , महाशिवरात्रीच्या उत्सवात शिव मंदिरावर ड्रोन कॅमेऱ्याचा लेझर शो पार पडणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या या संकल्पनेमुळे औंढा नागनाथ मध्ये पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे दरम्यान लवकरच औंढा नागनाथ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील करण्यात येणार असून मंदिर परिसरात याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण कृषी सहकारातील पहीलं वहीलं साहीत्य संमेलन
चिपळूण मधील पालवण येथे आज पासून पुढचे तीन दिवस चालणार संमेलन
राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन
ढोल ताशांच्या गजरात निघाली ग्रंथदिंडी
आकर्षक देखाव्यासोबत संमेलनाच्या ठिकाणी निघाली शोभायात्रा
विद्यार्थी वर्गाचा ग्रंथ दिंडीत उत्साहात सहभाग
पालखी, कोकणातल्या विविध लोककला या शोभायात्रेमधला आकर्षण
परभणी पोलीस दलातील 97 जागांसाठी आजपासून पोलीस भरतीला सुरुवात केली आहे एकूण 97 जागांसाठी तब्बल दहा हजार 679 अर्ज दाखल झालेत आहे आणि या सर्वांसाठी आजपासून मैदान चाचणीला सुरुवात झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंदाची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. दररोज 1000 उमेदवार मैदानी चाचणी देतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात करण्यात आलं होत दाखल
खोकल्याचा त्रास आणि इतर काही व्याधीमुळे शरद पवार गेल्या 5 दिवसांपासून होते रुग्णालयात
शरद पवार यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांची माहिती
आज सकाळी 11 वाजल्यानंतर शरद पवार यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज मिळणार
थकबाकीदार,मिळकतकरधारकांना आणखी दिलासा, पुणे महापालिकेच्या अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
पुणे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपणार होती.
या पार्श्वभूमीवर योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.या मागणीचा सकारात्मक विचार करत महापालिका कर विभागाकडून तात्काळ निर्णय घेत अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
अभय योजनेअंतर्गत मिळकतकराच्या थकीत रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून तब्बल ८०१ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.
सोन्या चांदीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रियजनांना मौल्यवान अशी भेट काय द्यावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कारण कोणाच्या वाढत्या भावामुळे अनेक जण आता 22 व 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यान ऐवजी रोज गोल्ड च्या दागिन्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्ण नगरीमध्ये ही आकर्षक असे रोज गोल्ड चे दागिने दाखल झाले असून कमी बजेटमध्ये ग्राहकांसाठी रोज गोल्ड चे दागिने उत्तम पर्याय ठरणार आहे
यवतमाळ जिल्ह्यात आग लागून ट्रॅव्हल्स अपघात होणे यामध्ये जीवितहानी झाल्याच्या घटनांची नोंद यापूर्वी झालीये आग लागून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे पुढील कालावधीत अशा घटनांची नोंद होऊ नये याकरिता यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांनी ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना पाठविले आहे.
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील येवदा बसस्थानक व राष्ट्रीय महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग,महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली.यापूर्वी संबंधितांना नोटिसा देऊन मुदत देण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने थेट कारवाई सुरू केली.जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या हद्दीतील शेड, पत्रे व तात्पुरती बांधकामे हटविण्यात आली.कारवाईदरम्यान काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले साहित्य हटवले,तर काही ठिकाणी प्रशासनाला यंत्रणांच्या मदतीने अतिक्रमण काढावे लागले. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कारवाईमुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.पोटापाण्याच्या व्यवसायावर गदा आल्याने मजुरी दाखल होत असलेली कमाई बंद झाली त्यामुळे बेरोजगारीची वेळ आल्याचे मत काहींनी व्यक्त केले..
अँकर - यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तळणी येथील इन्फ्रा कंपनीमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे गेल्या दोन वर्षापासून नुकसान झाले असून मोजक्या शेतकऱ्यांना सदर कंपनीने तुटपुंजी मदत दिलेली आहे परंतु जे खरे नुकसान झालेले शेतकरी अजूनही नुकसान भरपाई पासून वंचित आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याने नुकसान भरपाई त्वरित द्या अन्यथा काम चालू देणार नसल्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
अमरावती महानगरपालिकेत 20 फेब्रुवारी रोजी पहिली आमसभा होणार आहे, या सभेत विरोधी पक्ष नेता, पक्षनेता, गटनेता, विविध समित्या सह स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी सदस्य नियुक्ती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे याची आता उत्सुकता संपली असून 20 तारखेला होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे अमरावती महानगरपालिकेचे महापूर श्रीचंद तेजवानी यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे, अमरावती महानगरपालिकेत आठ स्वीकृत नगरसेवक तर 16 स्थायी सदस्य नियुक्त केले जाईल
पोलीस भरती प्रक्रियेत बोगसगिरी टाळण्यासाठी कडकोट तपासणी प्रणालीचा वापर केला जात आहे टू स्टेप वेरिफिकेशन केल्यानंतरच उमेदवाराला आयएफआयडी टॅग फ्रिक्वेन्सी आयडॅटीफिकेशन लावला जात आहे. त्यानंतर उमेदवाराला भरतीच्या मैदानात एन्ट्री दिली जाते तिथेही कॅमेरा समोर उभे राहून पुन्हा पडताळणी केली जात असून या ठिकाणी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक तीन उपविभागीय पोलिस अधिकारी पहाटे चार वाजल्यापासून भरतीच्या ठिकाणी तळ ठोकून राहत आहेत.
नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकही मित्रपक्षांसोबतच लढवणार असल्याचे संकेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. मात्र यानिमित्ताने सध्या सत्तेत मित्र असलेल्या आमदार सतेज पाटील यांना बाजूला ठेवण्याचे सूचक विधानही त्यांनी केले.
अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची बांगलादेशी विरोधात धडक कारवाई
20 हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात
सर्वजण भारतात वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती
अचूक गुप्त माहितीच्या आधारे एटीसी (ATC) पथकाची लक्षित मोहीम
पुरुष व महिलांना ताब्यात घेऊन ओळख आणि कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू
भारतात प्रवेशासाठी कोणत्या नेटवर्कचा वापर झाला याचा तपास
गेल्या चार दिवसांत मुंबईत पकडलेल्या अवैध प्रवाशांचा आकडा 30 पार
8 फेब्रुवारी रोजी मालाड पठाणवाडी परिसरातून 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक
ताब्यातील सर्वांची ओळख पडताळणी सुरू असून.पोलिसाकडून डिपोर्टेशन प्रक्रियेला सुरुवात
मुंबई पोलिसांचा इशारा – शहराच्या सुरक्षेशी तडजोड नाही, मोहीम सुरूच राहणार
रिव्हॉल्व्हर काढून स्वतःचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देण्यावर गुन्हा दाखल
महेंद्र लोणकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या कर विभागात स्वतःला संपवून टाकेल अशी दिली होती अधिकाऱ्यांना धमकी
अपघातानंतर संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक करत तोडफोड : दगडफेक करत संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडल्या...
अपघातानंतर मोठा जमाव जमल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण झाल्याने दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा बंदोबस्त बोलवण्यात आला होता.
संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त वाशिमच्या पोहरादेवी आणि वसंतनगर परिसर रोषणाईने उजळून निघाला आहे. जयंती उत्सवानिमित्त गावातील मुख्य रस्ते, चौक आणि मंदिर परिसर आकर्षक विद्युत सजावटीने सजविण्यात आले असून संपूर्ण गाव झगमगाटात न्हाऊन निघाले आहे. रंगीत दिव्यांच्या कमानी, आकर्षक लाईट्स आणि सजावटीमुळे रात्रीच्या वेळी परिसरात नयनरम्य दृश्य पाहायला मिळतय.
भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखा ठाणे पोलिस आयुक्तालय येथे चौकशी साठी रात्री उशिरा आणण्यात आले होते. पहाटे पर्यंत त्यांना अटक दाखविण्यात आलेले नाहिये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.