Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates : विजेचा शॉक लागून तीन जण ठार तर एक जण जखमी,मृतात 13 वर्षाच्या मुलाचा समावेश

Satish Daud

सांगलीमध्ये विजेचा शॉक लागून तीन जण ठार तर एक जण जखमी,मृतात 13 वर्षाच्या मुलाचा समावेश.

Vidhan Sabha Election : औसा, निलंगा आणि अहमदपूर या 3 विधानसभा जागेवर ठाकरे गटाचा दावा

लातूर जिल्ह्यातल्या 3 विधानसभा जागेवर उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे..औसा, निलंगा आणि अहमदपूर या तीन विधानसभा मतदारसंघावर दावा टाकला आहे. या तीन मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे...,त्यामुळे ह्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून पुन्हा एकदा रस्सीखेच पाहयला मिळात आहे..., दरम्यान या अगोदर महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी देखिल लातूरच्या सर्वच सहा, विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता.... मात्र अमित देशमुख हे स्थानिक नेते म्हणून बोलले असतील त्यामुळे त्यांचा दावा हा अधिकृत नाही ..अधिकृत दावा हा नाना पटोले यांचा आहे जर त्यांनी दावा केला तर, त्यावर आम्ही उत्तरे देऊ.. अशा प्रकारची प्रतिक्रिया यावेळी सुषमा अंधारे यांनी अमित देशमुख यांच्या केलेल्या दाव्यावर केली आहे.

Rohit Pawar News : रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये लागले भावी मुख्यमंत्री असे बॅनर

- आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये लागले भावी मुख्यमंत्री असे बॅनर...

- काल शरद पवारांच्या सूचक वक्तव्यानंतर भावी मुख्यमंत्री यांचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात बॅनरची चर्चा...

- रोहित पवारांच्या जामखेड मतदार संघातील कार्यक्रमात काल शरद पवारांनी रोहित पवारांनसंदर्भात केले होते सूचक वक्तव्य...

- रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची पुढची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असेल असे शरद पवारांनी काल केले होते वक्तव्य...

- नाशिक शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचे बॅनर चर्चेत...

Pune News : उदय सामंत यांचा मोबाईल हरवला

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवला आहे. कोणाला मिळाला असेल तर आणून द्या, आयोजकांनी मंचावरून जाहीर केलं.

PM Modi Inaguration Pune Metro: पुण्यातील मेट्रो, विकासकामांचे Pm मोदींकडून उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. यावेळी बोलताना त्यांनी पुण्याचा सर्वांगिण विकास करणार असल्याचे सांगितले.

Kolhapur News: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणी टाळ मृदुंगाच्या निनाद आणि भक्तीरसात तल्लीन

इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी टाळ मृदुंगाच्या निनादात आज भक्तीरसात नाहून निघाल्या. एकाच वेळी अकरा हजार महिलांनी हरिपाठ म्हणत वेगळा विक्रम रचला.आमदार प्रकाश आवाडे आणि राहूल आवाडे यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यामुळे इचलकरंजीत आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.वारकरी संप्रदायाने सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. वारकरी संप्रदायाला सरकारने दिंडीला 20 हजार रुपये दिले होते त्यामुळे त्यांनीही यात सहभाग घेतला होता. आगामी काळात विठ्ठलाचा आशीर्वाद कष्टकऱ्यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी व्यक्त केली

Dhule News:  भल्या मोठ्या अजगराला सर्पमित्राने केले रेस्क्यू

धुळे शहरातील मालेगाव रोड परिसरात असलेल्या गोशाळा परिसरातील रस्त्यावर भला मोठा अजगर परिसरातील नागरिकांना आढळून आला, त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रास या संदर्भातील माहिती दिली, सर्पमित्राने आपल्या टीम सह संबंधित ठिकाणी पोहोचून या भल्या मोठ्या अजगराला रेस्क्यू करत पकडले आहे,

या भल्या मोठ्या आजाराला सर्पमित्राने अत्यंत शिताफीने रेस्क्यू केले आहे, आदर्श सर्पमित्र ग्रुपच्या या सर्पमित्रांनी या भल्या मोठ्या अजगराला सुरक्षितपणे पकडले असून, आता भारतीय जातीच्या या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात लवकरात लवकर सोडण्यात येणार आहे, लळींग कुरणामध्ये या अजगराला सोडण्यात येणार असल्याचे या सर्पमित्रातर्फे सांगण्यात आले आहे.

Pandharpur News:  पंढरपुरात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ उपकेंद्राचे उद्घाटन

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पंढरपूर मधील उपकेंद्राचे उद्घाटन अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते अर्जुन चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज पंढरपूरमध्ये झालं यामुळे पंढरपूर सांगोला माढा माळशिरस करमाळा मंगळवेढा परिसरातील मराठा समाजातील तरुणांना या उपकेंद्राच्या माध्यमातून कर्ज मिळण्यासाठी मदत उपलब्ध होणार आहे आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात दहा हजार पेक्षा जास्त अधिक मराठा तरुणांना महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक होण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

Yavatmal News: यवतमाळात किरकोळ भाजी विक्रेत्यांचा संप

यवतमाळ शहरात आठवडी बाजार असताना किरकोळ भाजी विक्रेत्यांनी अचानक संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. बाजार समितीच्या भाजी मंडईतून ठोक भाजी विक्रेते हे चिल्लर स्वरूपातही भाजी विकत असल्याने त्याचा परिणाम शहरातील फिरत्या व किरकोळ भाजी विक्रीवर होतो. बरेचसे नागरिक हे थेट भाजी मंडईतूनच खरेदी करीत असल्याने किरकोळ भाजी विक्रेत्यांचे नुकसान होते, शिवाय मंडईत गर्दी होत असल्याने किरकोळ विक्रेते त्या ठिकाणी अडकून पडतात. परवाना नसलेले लोक मंडईत ठोक व चिल्लर विक्री करीत असल्याचाही आरोप आहे. याचा मोठा आर्थिक फटका पडत असल्याने सर्व किरकोळ भाजी विक्रेत्यांनी खरेदी न करता संप पुकारला.

Nandurbar News:  माजी मंत्री पद्माकर वळवी काँग्रेसच्या वाटेवर

आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपा आलेले माजी मंत्री पद्माकर वळवी पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. पद्माकर वडवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु एखादी पक्षाने मला तिकीट दिल तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार संकेत पद्माकर वळवी यांनी दिले आहेत. मला चांगली संधी मिळाली तर ते संधीच्या मी फायदा घेणार, पद्माकर वळवी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता,गेल्या अनेक दिवसापासून पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात वक्तव्य करत आहेत परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शहादा तळोदा मतदारसंघ किंवा अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून लढण्याची इच्छा पद्माकर वळवी यांनी व्यक्त केली आहे.

Beed News: भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के बंडखोरीच्या तयारीत, बीडमध्ये महायुतीत ठिणगी ?

भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पक्षाने तिकीट देऊ किंवा न देऊ निवडणूक लढवणार असे म्हणत राजेंद्र मस्के हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.. बीडमध्ये आयोजित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.. आमचा गाडा विधानसभेच्या शर्यतीत उतरणार आहे. फक्त बैल कोणते या बैलगाड्याला लावायचे हे ठरणे बाकी असल्याचे म्हणत भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केलाय.. तसेच शेतकरी मित्र राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या माध्यमातून बीड मतदारसंघात बांधणे सुरू केली आहे..

Nanded News : दूषित पाणी प्यायल्याने जवळपास सातशे नागरिकांना त्रास, ग्रामसेवक निलंबित

नांदेडच्या नेरली गावात शुक्रवारी मध्यरात्री शेकडो ग्रामस्थांना जुलाबा व उलट्या, मालमळीचा त्रास झाल्याने त्यांच्यावर नांदेड शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामुळे हा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळपास सातशे लोकांना या त्रासातून जावे लागले. अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याने त्यांच्या बिलावर तोडगा काढणे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मोठं आव्हान आहे.

तर गावातील सार्वजनिक नळ योजनेचे पाणी नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आज प्रशासनाकडे प्राप्त होणार आहे. आरोग्य विभागाचे पथक अजूनही गावात तळ ठोकून आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ नेरली येथील ग्रामसेवकांना निलंबित केले आहे.

Pandharpur News : नवरात्र उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छतेचे काम सुरू

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पासून स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली आहे. येत्या 3 आक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे. यासाठी विठ्ठल आणि रूक्मिणी गाभार्यासह मंदिराची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. दोन दिवस स्वच्छतेचे काम सुरू राहणार आहे. दरम्यान दर्शन वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही.

Maval News : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

रविवार सुट्टीच औचित्य साधून मावळातील लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. गेल्या आठवडा भर पावसाने मावळात तुफान बॅटिंग केली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. लोणावळ्यातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरून लोहगडला पसंती दिली आहे.

Nagpur News : नागपूर येथील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल ४८ हजार प्रकरणे निकाली

नागपूर जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती. या अदालतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय लोक अदलातमध्ये तब्बल ४८ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण समझोता रक्कम कोटीच्या घरात गेली. घटस्फोट आणि कौटुंबिक वाद प्रकरणांतील २३ जोडप्यांमध्ये आपसी समझोता पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू झाला.

Amravati News : नितेश राणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत हाय अलर्ट

अमरावतीच्या अचलपूर शहरात आज नितेश राणेंच्या उपस्थितीत 'हिंदू जन आक्रोश मोर्चा व धर्मसभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आली आहे. अचलपूर-परतवाडा शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. अमरावती ग्रामीण क्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राणेंच्या दौऱ्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असा अहवाल पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: प्रेग्नंसीनंतर दीपिका पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर, आरोग्याबाबत दिली माहिती...

Sambhajinagar Corporation : कर भरणाऱ्यांनाच आता मनपा देणार कंत्राट; महापालिका प्रशासकांचा निर्णय, सादर करावे लागेल एनओसी

Maharashtra Politics : "देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लान, भाजपमधून तावडेंना पुढे आणलं जातंय"

PM Modi Speech: 'विकसित देशाचे केंद्रस्थान पुणे..', पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन; नव्या मेट्रो मार्गिकेचे केलं लोकार्पण

Success Story: केवळ २ हजारांत सुरुवात, आता महिन्याला ६ लाखांची कमाई; ठाण्याच्या 'लाडक्या बहिणी'ची यशोगाथा

SCROLL FOR NEXT