MNS workers protest against Sanjay Nirupam in Dahisar, vandalizing his vehicle amid the Marathi language controversy. saam tv
महाराष्ट्र

मराठीच्या मुद्द्यावर शिंदे गटात फूट, निरुपम मराठीद्वेष्ट्या भय्यांच्या पाठीशी, संतापलेल्या मनसैनिकांची निरुपमांच्या गाडीवर दगडफेक

Marathi Language Row: मराठी सक्तीविरोधात अमराठी भय्ये तर एकवटले आहेतच... मात्र शिंदेसेनेतही मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन फूट पडलीय.. ती नेमकी कशी.. आणि मनसेनं संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक का केलीय...

Bharat Mohalkar

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आल्यानं अमराठी भय्ये अस्वस्थ झालेत...तर याच मुद्द्यावरून आता शिंदे गटातच फूट पडलीय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला आव्हान देत संजय निरुपम मराठीद्वेष्ट्या भय्यांच्या पाठीशी उभे राहिलेत... दहिसरमध्ये अमराठी भय्यांशी संवाद साधण्यासाठी संजय निरुपम गेले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या संतापाचा भडका उडाला... दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक केलीय..

मनसेचे कार्यकर्ते फक्त दगडफेक करुनच थांबले नाहीत... तर मनसैनिकांनी संजय निरुपम परत जा म्हणत जोरदार घोषणाबाजी केली... मराठी भाषिकांचा संताप पाहिल्यानंतर संजय निरुपम यांनी मवाळ भूमिका घेतलीय.. अमराठी भाषिकांना मराठी शिकण्यासाठी वेळ देण्याची मागणी निरुपम यांनी केलीय... दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडेंनी हिच अमराठी लोकांना धडा शिकवण्याची वेळ असल्याचं म्हटलंय..

खरं तर 2019 मध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र मोटार व्हेईकल कायदा 1989 मध्ये सुधारणा केली... त्यात नियम 4, 78 आणि 85 नुसार रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आलीय.. मात्र लायसन्स काढताना किंवा त्याचं नतुनीकरण करताना मराठी भाषा आली नाही तर त्याचं लायसन्स रद्द करण्याची तरतूद या नियमात आहे.... तर हा नियम 1 मे नंतर लागू करण्यात येणार आहे.. आता अमराठी भय्ये हा नियम लागू करण्यास आणि मराठी शिकण्यास वेळ देण्याची मागणी करत आहेत...

मात्र हा नियम लागू करुन 8 वर्षे झाले.. या 8 वर्षात जे मराठी शिकले नाहीत... ते मुदत वाढवून दिली तर शिकतील का? असा प्रश्न निर्माण झालाय.. त्यामुळे परप्रांतीय रिक्षाचालकांच्या दबावामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माघार घेणार की मराठी भाषिकांचा सन्मान करत मराठी न येणाऱ्या रिक्षा व ऑटो चालकांवर कारवाई करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची उभ्या कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची नाशिकमध्ये बैठक सुरू

शरीराच्या 'या' भागाचे दुखणं सांगेल तुम्हाला डायबिटीज आहे! रक्तातील साखर वाढल्यास दिसतात 'ही' ८ लक्षणे

MLC Election : ठाण्यात शिंदेंच्याच शिवसेनेचा विजय निश्चित, एक फोन अन् पवारांची अचानक माघार

Heat stroke symptoms: हीट स्ट्रोक की हार्ट अटॅक...! कसा ओळखाल दोघांमधील फरक?

SCROLL FOR NEXT