Marathi language controversy saam TV
महाराष्ट्र

मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद; फडणवीसांच्या 'त्या' निर्णयावर शिंदेंचे मंत्री नाराज, खळबळजनक दावा आला समोर

Maharashtra Politics: मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. फडणवीसांच्या निर्णयामुळे शिंदे सेनेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Namdeo Kumbhar

Marathi language controversy : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीमधील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री कमालीचे नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेऊन निर्णय घेतला नसल्याने शिंदेंचे मंत्री नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामध्ये बदल करत रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी तब्बल एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. गुरुवारी (२७ ऑगस्ट) रिक्षा-टॅक्सीचालकांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी एका वर्षाची मुदत दिली आहे. त्याशिवाय तोपर्यंत चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शिंदेसेनेच्या गोटात तीव्र असंतोष पसरला आहे. मराठीच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना किंवा परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. या एकतर्फी भूमिकेमुळे शिवसेनेचे मंत्री प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद अधिक गडद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या राजकीय घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप सूत्रांकडून केला जात असून, यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याची घोषणा केली. हा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी परिवहन मंत्रालय किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नाही किंवा चर्चेत घेतले नाही, असे नाराज मंत्र्यांचे म्हणणे आहे.

सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. दोन दिवसांपूर्वीच परिवहन मंत्र्यांनी वेगळी भूमिका घेतली असताना, मुख्यमंत्र्यांनी परस्पर वेगळा निर्णय जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात प्रश्नचिन्ह आणि नाराजी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT