Marathi language digital knowledge language AI technology 
महाराष्ट्र

AIच्या युगात मराठीची नवी ओळख; फडणवीसांनी सांगितला भाषेच्या विस्ताराचा रोडमॅप

CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी AI, डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, अवकाश तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांत मराठीचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. मराठीला ज्ञानभाषा म्हणून सक्षम करण्यावर त्यांनी भर दिलाय.

Bharat Jadhav

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१ व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाचा चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा अभिमानाचा क्षण

मराठी भाषा प्राचीन आणि अभिजात आहेच; मात्र तिला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेची अधिकृत मान्यता मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर विशेष अधोरेखित स्थान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संकल्पनेसोबत स्वभाषेलाही महत्त्व दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मराठीच्या प्रशासकीय वापराला नवी दिशा मिळाली, अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी करून दिली.

मराठी शब्दसंपदा वाढविण्याची गरज

जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा १३वा क्रमांक असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी ही जागतिक स्वरूपाची भाषा आहे. विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये ११ ते १३ लाख शब्द असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तुलनेत ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे सहा लाख शब्द, तर मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंचसारख्या भाषांमध्ये साधारण तीन ते साडेतीन लाख शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे तीन लाख शब्द आहेत. त्याच्या पुढील आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा १३ लाख शब्दांपर्यंत नेण्याचे काम करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली.

‘मराठी AI’च्या माध्यमातून नव्या युगाशी नाते

डिजिटल तंत्रज्ञानामुळे संवादाची माध्यमे वेगाने बदलत आहेत. अशा परिस्थितीत मराठीला केवळ पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘मराठी AI’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढविणे, डिजिटल माध्यमांवर मराठीतील माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दिपके दिल्लीत धडकणार, 10 मुंबईतील आंदोलनानंतर CJPचा 'प्लॅन बी'

Maharashtra News Live Update: सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर आमची ताकद वाढेल: रामदास आठवले

14 पोलीस आयुक्तांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

SCROLL FOR NEXT