महाराष्ट्र

Hingoli News : 'मराठा समाजात जन्माला आलो हा माझा गुन्हा आहे का?', २७ वर्षीय तरुणाने आरक्षणासाठी जीवन संपवलं

Maratha Youth End life for Reservation : आदिनाथ राखुंडे असं 27 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे.

संदीप नागरे

Hingoli News :

मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा तरुण तर आरक्षणासाठी टोकाची भूमिका घेताना दिसत आहे. हिंगोलीतूनही अशीच एक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत एका तरुणाने जीवन संपवलं आहे.

आदिनाथ राखुंडे असं 27 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील आजरसोंड गावात ही घटना घडली आहे. घरातील विजेच्या तारांना पकडून आदिनाथने आत्महत्या केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृत्यूआधी आदिनाथने सुसाईड नोटदेखील लिहून ठेवली. यात त्याने लिहिलं की, मराठा समाजात जन्माला आलो हा माझा गुन्हा आहे का? उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याचं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. (Latest Marathi News)

तरुणांनी टोकाचं पाऊन न उचलण्याचं आवाहन

आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. तुम्ही असं टोकाचं पाऊल उचललं तर आरक्षणाचा उपयोग काय? असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी केले आहे. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांच्या आत्महत्येची माहिकी संपण्याचं नाव घेत नाही.

कुणबी नोंदीचा शोध सुरु

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचे काम सुरु केले आहे. सरकारचं काम वेगाने सुरु आहे. सरकारकडून नेमलेल्या समितीकडून कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी कुणबी नोंदी देखील आढळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT