Kunbi Certificate Rules: Jalna Collector Explains Verification Process Amid Jarange Protest saam tv
महाराष्ट्र

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Kunbi Certificate Process Under Rules: जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वंशावळ आणि आवश्यक पुराव्यांची पडताळणी करावी लागते. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात एक-दोन दिवसांत प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Bharat Jadhav

  • जालना जिल्ह्यात मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा एकूण 5,027 नोंदी आढळल्या आहेत.

  • कुणबी प्रमाणपत्रासाठी जालना जिल्ह्यात आतापर्यंत 18,200 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.

  • 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार 377 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत, अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत. त्याचदरम्यान जालनाच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी थेट प्रमाणपत्र वाटपाचा नियमच सांगितलाय. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कायदेशीर नियमांचे पालन करणे आणि वंशावळ सिद्ध करणे बंधनकारक असून, आवश्यक पुराव्यांशिवाय दाखले दिले जाणार नाहीत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. (Kunbi Certificate Rules: Jalna Collector Explains Verification Process Amid Jarange Protest)

जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, जालना जिल्ह्यात मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशा एकूण 5,027 नोंदी आढळून आल्या आहेत. यासंदर्भात जिल्ह्यात आतापर्यंत 18,200 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेत. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार 377 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व नोंदींची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आलीय. यासह SEBC नुसार 35,981 प्रमाणपत्रे देण्यात आलीत. जात पडताळणी समितीकडे प्राप्त झालेल्या 1,664 अर्जांपैकी 1,016 जणांची पडताळणी पूर्ण करून प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे?

कुणबी प्रमाणपत्र हवे असेल तर त्या नागरिकांनी काय करावे, याची माहितीही जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिलीय. कुणबी प्रमाणपत्र हवे असेल तर कार्यालयात येताना नोंदीचे आवश्यक पुरावे सोबत घेऊन यावेत. नियमानुसार अर्ज करावा लागेल. त्याशिवाय दाखले मिळणार नाहीत. यासह वंशावळ सिद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमानुसार अर्जदारांना SEBC किंवा कुणबी यापैकी एकाच पर्यायाची निवड करावी लागेल. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत.

जालना जिल्ह्यासाठी जाधव यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. राज्यात जातीच्या आधारावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आपले राज्य प्रगतिशील आणि मॉडर्न असल्याचे नमूद करत प्रशासनाने विकासावर भर देण्याचे आवाहन केले आहे. एका विकसित राज्यात जातीचा प्रश्न मागे ठेवून प्रगती आणि विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे , असा संदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT