Maratha Reservation Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'जरांगे पाटलांच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला माझा विरोधच', रामदास कदम

Maratha Reservation, Ramdas kadam: कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, अशी भूमिका रामदास कदम यांनी घेतली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Reservation

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर आंदोलनाचा धडाका लावला आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) रामदास कदम यांनी मात्र, जरांगे पाटलांच्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध केला आहे. जरांगे पाटलांचा महाराष्ट्र आणि कोकणाचा तेवढा अभ्यास नाही. विदर्भात कुणबी मराठे चालतं, मात्र कोकणात चालत नाही, याची माहीती जरांगेना नाही. त्यामुळे भावनात्मक ब्लँकमेल करू नये. कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, अशी भूमिका रामदास कदम यांनी घेतली आहे. त्यामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर...; रामदास कदमांनी व्यक्त केली शक्यता

हा महाराष्ट्र आहे बिहार नाही, त्यामुळे शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी अध्यक्षांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये. तसेच विधानसभा अध्यक्षांनी काय तो निकाल देऊन हा खेळ एकदासा संपून टाकावा, अशी भावांना त्यांनी व्यक्त केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणाचे आमदार अपात्र होतील याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. आता अंतिम टप्प्यात ही लढाई आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर एकनाथ शिंदे न्यायालयात जातील आणि जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, तोच निर्णय जर अध्यक्षांनी घेतला, तर उद्धव ठाकरे यांचे 15 आमदार अपात्र होतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आमदार अपात्रतेवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना निर्देश दिले होते. यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, आमदार अपात्रतेचा संपूर्ण विषय हा अध्यक्षांचा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांना सातत्याने आदेश देत आहे. या आधी कोणत्याही न्यायालयाने विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप केला नव्हता, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT