Manoj Jarange-Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange-Patil: मोठी बातमी; मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोणत्या प्रकरणावरुन जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलाय ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलाय. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा वॉरंट काढण्यात आलाय. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले आहे.

नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्यांचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे ६ प्रयोग २०१३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला ५ लाख याप्रमाणे ३० लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले होते. पण नाटकाच्या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठीगडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

SCROLL FOR NEXT