Manoj Jarange Patil hunger strike latest news : Saam TV
महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस; 'या' १० अटींनुसार उपोषणाला परवानगी, जरांगेंकडून प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil hunger strike latest news : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू होत आहे. गोंदी पोलिसांनी BNSS कलम १६८ अंतर्गत नोटीस देत १० अटी घातल्या असून, जरांगे पाटलांनी नोटीसवरच लेखी उत्तर दिले आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Manoj Jarange Patil Gets Police Notice : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे आमरण उपोषण सुरू होत आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गोंदी पोलीस ठाण्याकडून मनोज जरांगे पाटील यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६८ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गणेश गुरले यांनी ही नोटीस जारी केली असून उपोषण कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून १० महत्त्वाच्या अटी व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी नोटीसमध्ये घातलेल्या प्रमुख अटी:

वाहतूक व पार्किंग: उपोषणादरम्यान महामार्गावर किंवा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था दिलेल्या ठिकाणीच करावी आणि यासाठी स्वयंसेवक व समन्वयक नियुक्त करून त्यांची यादी पोलिसांना सादर करावी.

ध्वनीप्रदूषण व कायदे: ध्वनीप्रदूषण कायद्याचे आणि नियमांचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

जमावबंदीचे पालन: जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी लागू केलेल्या जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशांचे तंतोतंत पालन करावे.

सामाजिक सलोखा: उपोषणादरम्यान कोणत्याही समाजाच्या किंवा जाती-धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्रक्षोभक किंवा चिथावणीखोर भाषणे करू नयेत.

न्यायालयाचे निर्देश: सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध याचिकांमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशांचे उल्लंघन होणार नाही याची नोंद घ्यावी.

सुरक्षा व इतर व्यवस्था: उपोषणस्थळी वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सोय करावी, तसेच ज्वलनशील पदार्थांचा वापर होणार नाही आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

जरांगे पाटलांचे नोटीसवरच पोलिसांना उत्तर

पोलिसांनी दिलेल्या नोटीसवरच मनोज जरांगे पाटील यांनी आपले लेखी उत्तर लिहून नोटीस स्वीकारली आहे. नोटीसवर स्वाक्षरी करताना त्यांनी लिहिले की, "अंतरवाली येथील आमरण उपोषण हे गेल्या तीन वर्षांपासून लोकशाही मार्गाने शांततेत सुरू आहे आणि ते शांततेतच सुरू राहणार आहे. मात्र सरकारकडूनच कायद्याचे उल्लंघन करून मराठा समाजावर पोलिसांच्या बळाचा वापर करून हल्ला करण्याचे प्रकार घडले आहेत. यापूर्वीही आंदोलकांवर खोटे आणि अमानुष प्रकार घडले असून, यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सरकारच जबाबदार असणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

कोल्हापुरात प्रेमसंबंधातून थरारक घटना; अपहरण केलं नंतर प्रेयसीला खोल दरीत ढकललं!

SCROLL FOR NEXT