Maratha Reservation Protest In Nanded  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation Protest: संताप, जाब आणि घोषणाबाजी; मराठा तरुणांचा माजी मुख्यमंत्र्यांना घेराव; पाहा व्हिडिओ

Nanded News: संताप, जाब आणि घोषणाबाजी; मराठा तरुणांचा माजी मुख्यमंत्र्यांना घेराव; पाहा व्हिडिओ

Satish Kengar

>> संजय सूर्यवंशी

Maratha Reservation Protest In Nanded:

नांदेडच्या धर्माबादमध्ये माजी मुख्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा समाजाच्या तरुणांनी तीव्र विरोध केला आहे.

अशोक चव्हाण यांची नांदेडच्या धर्माबादमध्ये काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत बैठक होती. बैठक आटोपून अशोक चव्हाण हे बाहेर पडताच मराठा युवकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं.

''तुम्ही उपसमीतीचे अध्यक्ष होता, तेव्हा तुम्ही काय केलं'', असा संतप्त सवाल या मराठा युवकांनी केला आहे. सध्या नांदेडच्या धर्माबादमध्ये देखील मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक, खासदारांनी कार्यक्रम केले रद्द

अशोक चव्हाण यांच्या या घटनेनंतर भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपले उद्याचे कार्यक्रम रद्द केले आहेत. उद्या रविवारी नांदेडच्या लोहा येथे रस्ता भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

परंतु मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहून लोह्यातील रस्ता भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपाच्या वतीने देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

SCROLL FOR NEXT