Manoj Jarange: Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

Manoj Jarange On Shindesena: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले आहे. त्यांना सध्या हल्ल्याची भीती वाटत असून त्यांनी शिंदेसेनेवर गंभीर आरोप केला आहे.

Suprim Maskar
  • मनोज जरांगे यांनी मराठ्यांवर हल्ल्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला

  • शिंदेसेनेच्या २ मंत्र्यांवर जरांगेंचे गंभीर आरोप

  • मुंबई आंदोलनापूर्वी मराठ्यांवर हल्ल्याचा कट रचला जातोय

  • मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपाने खळबळ उडाली

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. फडणवीसांच्या बदनामीसाठी मराठ्यांवर हल्ल्याचा कट रचला जातोय, असा मोठा आरोप जरांगेंनी केलाय. कोणत्या सत्ताधारी पक्षाने हा कट रचलाय? कोणते मंत्री यात सहभागी आहेत? यावरचा हा विशेष रिपोर्ट...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेल्या जरांगेंनी आता सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय..एकीकडे सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली असली, तरी सर्व मागण्या 12 सप्टेंबरच्या आत मान्य करा, अन्यथा मुंबईत मराठ्याचं वादळं धडकणारच, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. मात्र मुंबईत जाताना मराठ्यांवर हल्ला करून फडणवीसांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा मोठा गौप्यस्फोट जरांगेंनी केलाय. एवढंच नव्हे तर दोन मंत्री आणि दोन प्रवक्त्यांनी या कटाबाबत चर्चा केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.

जरांगेंच्या आमरण उपोषणामुळे मराठा समाजाचा रोष सातत्याने वाढत चाललाय. अशातच मुंबईतील आंदोलनाची नवी दिशा 12 सप्टेंबरला ठरवली जाणार असल्याचं जरांगेंनी सांगितलयं. तसचं मराठ्याचं रक्त सांडल्यास संपूर्ण महाराष्ट्र बंद करणार, असा इशाराही जरांगेंनी सरकाराला दिलाय. दरम्यान जरांगेंनी शिंदेसेनेनं मंत्र्यांवर आणि प्रवक्त्यांवर केलेले हल्ल्याचे आरोप फेटाळून लावलेत.

मुंबईतल्या आंदोलनानंतर जरांगेंनी वेळोवेळी एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं. जरांगेंसोबत चर्चेतही शिष्टमंडळातील शिंदेसेनेचे दोन मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई पुढाकार घेताना दिसले. मात्र यंदाच्या आंदोलनाच्या सुरूवातीपासूनच जरांगेंनी शिंदेंना विविध मुद्यांवरून लक्ष्य केलंय. आता तर त्यांनी थेट मराठ्यांवर हल्ल्याच्या कटाचा आरोप केलाय. या आरोपांचा नेमका रोख शिंदेंचे कोणते मंत्री आणि प्रवक्त्यांवर आहे याबाबत आता उत्सुकता निर्माण झालीय. जरांगेंचं आंदोलन आरक्षणासाठी असलं तरी या निंमित्तानं महायुतीतलं अंतर्गतराजकारणही उघड व्हायला लागल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT