Maratha Reservation: मराठा आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल, सोलापूर बसस्थानकातून होणाऱ्या १५०० फेऱ्या रद्द, २५ गाड्यांचे नुकसान  संजय जाधव
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल, सोलापूर बसस्थानकातून होणाऱ्या १५०० फेऱ्या रद्द, २५ गाड्यांचे नुकसान

Solapur Latest News: एसटी सेवा बंद असल्याने सामान्यांचे हाल होत आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असतानाच राज्यातील मराठा बांधवही आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना समोर येत असून याचा फटका सोलापूरमधील एसटी महामंडळाला बसल्याचे दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभर आंदोलने, निदर्शने होत आहेत. अनेक भागांमध्ये एसटी बसची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

सोलापूरमध्येही बससेवा बंद करण्यात आल्या असून स्थानकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ९ आगारातील तब्बल दीड हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोलापूर एस टी आगाराचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच एसटी बंद असल्याने सामान्यांचेही हाल होत आहेत.

दरम्यान, सोलापूरप्रमाणेच मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड, बीड, संभाजीनगर, सोलापूर, या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत भरस्त्यात टॅक्सी चालकाकडून तरुणाची हत्या, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

Drinking water before bed: झोपण्याआधी किती तास आधी आणि किती पाणी प्यावं? फायदे-तोटे जाणून घ्या

CBSE 12th Exam: सीबीएसईचा ७ देशांसाठी मोठा निर्णय, १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द

Khaja Recipe: सणासुदीला घरच्या घरी कुरकुरीत आणि गोड खाजा करा तयार, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT