Manoj Jarange Patil Chagan Bhujbal  Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'तुमच्या वाटेचं खावं, माझ्या नादाला लागू नये..' जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: तुम्ही तुमच्या वाटेचं खावं, उगाच झाड की पत्ती वगैरे म्हणून शेर शायरी करू नये. माझ्या नादाला लागू नये.." असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Gangappa Pujari

Manoj Jarange Patil News:

मराठा आरक्षणावरुन राज्यात सध्या वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. मराठा आरक्षणावरुन हिवाळी अधिवेशनातही सत्ताधारी- विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मात्र या प्रकरणात निष्पाप लोकांना अडकवल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"बीड जाळपोळ प्रकरणातील सरसकट गुन्हे वापस घेण्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले आहे ते घ्यावेच लागतील. यामध्ये निष्पाप लोकांना अडकवले तसे आमदारांनी देखील सांगितले आहे. परंतु सरकारला जाणून बुजून अडकवयच असेल तर त्यांचा प्रश्न आहे .तुम्हाला अन्याय करायचं तर जरा आमच्याही लक्षात राहत आहे. केसेस मागे घेतल्या नाही तर आम्ही पुढे बघू..." असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सरकारकडून मराठ्यांवर अन्याय...

"सरकार म्हणून अन्याय करायचं असेल तर हरकत नाही. तुम्ही भोळ्या पणात राहू नका. मराठ्यांना माहीत आहे तुम्ही आरक्षणासाठी काय करत आहेत. आज हातात आहे म्हणून झोडून काढणार का? तुम्ही आमच्यावर जाणून बुजून अन्याय केला. याची जाणीव होऊ द्या.." असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भुजबळांवर साधला निशाणा...

यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला." तुम्ही अनेकांना अंगावर घेतलं असेल. तुम्ही तुमच्या वाटेचं खावं, उगाच झाड की पत्ती वगैरे म्हणून शेर शायरी करू नये. माझ्या नादाला लागू नये.." असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. तसेच भुजबळांनी खोटं बोलून सुरक्षा वाढवून घेतल्याचा आरोपही जरांगेंनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT