Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : मनोज जरांगेंची शांतता रॅली आज नाशकात धडकणार; भुजबळ फार्मवरील पोलीस बंदोबस्त वाढवला

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांची मराठा शांतता रॅली आज नाशकात धडकणार आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून भुजबळ फार्मवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Satish Daud

मनोज जरांगे पाटील यांची मराठा शांतता रॅली आज नाशकात धडकणार आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून भुजबळ फार्मवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. याशिवाय समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर देखील स्थान बद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली काढली आहे. त्यांच्या या रॅलीला ठिकठिकाणांहून मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जरांगे यांनी मराठा शांतता रॅलीची पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात केली होती. रविवारी पुणे आणि सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात रॅली दाखल झाली.

या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शांतता रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. दरम्यान, आज मराठा शांतता रॅली नाशिकमध्ये दाखल होणार आहे. या रॅलीला ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भाषणानंतर नाशिकमध्येच रॅलीची सांगता होणार आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत.

नाशिक पोलिसांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याबाहेरील तसेच भुजबळ फार्मबाहेरील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध आहे. ते सातत्याने मनोज जरांगे यांच्यावर टीका करीत आहेत. आज जरांगे नाशिकमध्ये येत असल्याने काहीसा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक पोलिसांनी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर स्थान बद्धतेची कारवाई केली आहे. समता परिषदेचे सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगताप आणि शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतलं आहे. मराठा तसेच ओबीसी बांधवांनी सहकार्य करावे. तसेच कुणीही खोट्या अफवा पसरवू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT