Maratha Reservation Latest News Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं

Maratha Reservation Latest News: मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

Satish Daud

Maratha Aarakshan Latest News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील अंतरावाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास सदैव प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सांगितलं. (Latest Marathi News)

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे.

मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली (Jalna News) सराटी गावात उपोषण करत आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, सरकार तसा जीआर काढत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती.

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सकाळी ११ वाजता जालन्यात जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास तत्पर असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांनी आरक्षणात लक्ष घातले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील, असा मला विश्वास आहे. त्यांनी येथे येऊन ते सिद्ध केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. मी उपोषण सोडलं असलं, तरी आपलं आंदोलन शांततेत सुरू राहणार असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

समाजाला विचारुन मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील असा मला विश्वास आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT