Shinde Meets Amit Shah Saam TV News
महाराष्ट्र

अमित शाह अन् एकनाथ शिंदेंमध्ये महत्वाची बैठक, मनोज जरांगेंच्या 'त्या' मागणीवर चर्चा, तोडगा निघणार?

Maratha reservation Manoj jarange patil: मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण पुकारलं. मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची प्रमुख मागणी. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा.

Bhagyashree Kamble

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधवांनी आझाद मैदान गाठत ठिय्या मांडलं आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरून घडामोडी घडत असताना याचदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठक झाली. जवळपास १ तास बैठक झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. मराठा बांधवांसह आझाद मैदानावर त्यांनी ठिय्या मांडला आहे. सरकारकडे ते आरक्षणाची मागणी करत आहे. या मागणीवर सह्याद्री निवासस्थानी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली.

ओबीसी प्रवर्गातून मराठा बांधवांना आरक्षण द्यायचं झाल्यास कशा पद्धतीनं देता येईल, मध्यस्थी करत हा प्रश्न सोडवावा लागेल, अशी चर्चा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

मराठा कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी व्हायला हवी.

हैदराबाद गॅझिटिएर लागू करा, सातारा तसेच बाम्बे गॅझटिएर लागू करावा.

ज्या लोकांची कुणबी नोंदी सापडली, त्यांचे सगे सोयरे घ्या. पोट जात म्हणून घ्या.

मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याची मागणी.

कायद्यात बसणाऱ्या आरक्षणाची मागणी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कृषिमंत्र्यांनी केली घोषणा, म्हणाले दिवाळीआधी सर्वांना नुकसान भरपाई

Heavy Rain : बीड, जालन्यात ढगफुटी; नद्यांना मोठा पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला

सांगलीत जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा राज्यस्तरीय मोर्चा|VIDEO

Maharashtra Live News Update:देवीची मूर्ती आणायला गेलेल्या भक्ताचा भीषण अपघात; टँकरची धडक

GST Reforms: Maruti Suzuki च्या लोकप्रिय कारच्या किंमतीत मोठी घट, ग्राहकांसाठी खरेदी करणे सोपे

SCROLL FOR NEXT