Gunratna Sadavarte Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra News: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा एसटी महामंडळाला फटका , सदावर्तेंची दोन हजार कोटींची मागणी

Maharashtra News: मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनामुळे बस जाग्यावरच होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाला साडेतीनशे कोटींचा फटका बसल्याचं अ‍ॅड. गुणरत्न सतावर्ते यांनी म्हटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra News

मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनामुळे बस जाग्यावरच होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाला साडेतीनशे कोटींचा फटका बसल्याचं अ‍ॅड. गुणरत्न सतावर्ते यांनी म्हटलं आहे. एसटीतील कष्टकऱ्यांचा तीन दिवसाचा पगार, दुसऱ्या टप्प्यातील सात दिवसांचा पगार, बसेस आणि महामंडळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारने किमान दोन हजार कोटी रुपये देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आंदोलनांमध्ये सर्वात आधी बसेसना लक्ष्य केलं जातं, त्यामुळे महामंडळाला सरकारने सुरक्षा देणे अपेक्षित आहे. तसेच महामंडळाचे झालेलं नुकसान आणि एकूण सगळ्या गोष्टी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या विभागाचे सचिव जैन यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी विनंती केली आहे. एसटी महामंडळाचे झालेले साडेतीनशे कोटींचे नुकसान आणि इतर गोष्टींचा तात्त्विकदृष्ट्या हिशोब केला तर राज्य सरकारने किमान दोन हजार कोटी रुपये दिले पाहिजे, अशी मागणी सतावर्ते यांनी केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अ‍ॅड. गुणरत्न सतावर्ते गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घेतलेली उडी असो की मराठा समाजाला दिलेला कायदेशीर लढा असो, सतावर्ते यांनी या संबंधातील अनेक खटले न्यायालयात लढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT