Graph showing decline in EWS admissions as reservation categories shift under new Maratha quota policy. saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा परिणाम, EWS प्रवेशाला फटका, 'SEBC'कडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

EWS Admissions Drop: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशावर परिणाम झालाय.पाहूयात या विषयावरचा विशेष रिपोर्ट.

Suprim Maskar

  • मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून दिल्यामुळे EWS विद्यार्थ्यांवर परिणाम.

  • CET Cell च्या अहवालानुसार तीन वर्षांत 15% प्रवेश घट झालीय.

  • 3 वर्षांत प्रवेशाची टक्केवारी 15 टक्क्यांनी घसरली

कधी आरक्षणाची घोषणा, कधी त्याला न्यायालयातून स्थगिती, तर कधी नव्याने 'एसईबीसी' प्रवर्गाची निर्मिती, या राजकीय आणि कायदेशीर उलथापालथीमुळे मराठा समाजातले आणि आर्थिक दृश्य दुबळ घटकमधील विद्यार्थी कायमंच ऐरणीवर दिसले. याच धर्तीवर, आता उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रवेशांमध्येही हा गोंधळ स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला सादर केलेल्या अहवालातून असं समोर आलंय की मागील तीन वर्षांत 'ईडब्ल्यूएस' प्रवर्गातील प्रवेशामध्ये तब्बल 15 टक्क्यांनी घट झाली आहे.

पाहूयात ही आकडेवारी नेमकी काय आहे.

2023-24 मध्ये 11 हजार 184 जागा असताना 7 हजार 352 प्रवेश होते म्हणजेच तेव्हाच्या प्रवेशांची टक्केवारी होती 65.74 टक्के,

2024-25 मध्ये जागा होत्या 12,704 आणि प्रवेश होते 7,276 म्हणजेच प्रवेशांची टक्केवारी झाली 57.27 टक्के

आणि या वर्षी, म्हणजे 2025-26 ला जागा वाढून 14,393 इतक्या झाल्या पण प्रवेशांची आकडेवारी मात्र 7,241 इतकीच राहिली. म्हणजेच यावर्षी 50.31 टक्केच प्रवेश झालेत. म्हणजे जागा वाढल्या, पण प्रवेश घटले!

2020-21 नंतर मराठा समाजातील अनेक तरुण 'ईडब्ल्यूएस' कोट्यातून प्रवेश घेत होते. पण 'एसईबीसी' प्रमाणपत्र देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे त्यांचा 'ईडब्ल्यूएस'चा आधार हिरावला गेला. परिणाम काय झाला? 'ईडब्ल्यूएस'च्या जागा वाढल्या, पण त्या जागांवर प्रवेश घेणारे विद्यार्थी घटले! 65 टक्क्यांवरून ही प्रवेशाची टक्केवारी आज केवळ 50 टक्क्यांवर येऊन थांबली आहे.

EWS प्रवर्गातील प्रवेशाची टक्केवारी घटणं आणि विद्यार्थ्यांचा कल 'SEBC'कडे वाढणं या आकडेवारीतून हे सिद्ध होतं की, आरक्षणासंबंधीचे राजकीय निर्णय आता MPSC आणि इतर सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांनंतर थेट अभियांत्रिकीसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही अस्थिर करत आहेत. या आरक्षणाच्या आणि राजकीय मुद्यांमुळे विद्यार्थ्यांचा तोटा होणार नाही ना याकडे लक्ष असणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरंधा घाटात दुचाकीचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

Kidney Detox Drinks: वेट लॉस ते किडनी Detox; 'या' भाज्याचं ज्यूस प्या, तब्येत राहिल फिट, आजार छुमंतर

Stomach cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी दिसतात 'हे' संकेत; सामान्य लक्षणं समजण्याची चूक करू नका

Accidnet News : सोलापुरात भीषण अपघात! २५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल, डिव्हायडर तोडला अन्...

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

SCROLL FOR NEXT