मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जीआर
कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्रता
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?
सरकारचा जीआर काय सांगतो?
मराठा आरक्षणासंदर्भात काल मोठा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आलं आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी शासनाने जीआर काढला आहे. या निर्णयानुसार, आता हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी लक्षात घेऊन कुणबी प्रमाणपत्रे दिले जाणार आहे. पात्र व्यक्तींना ही प्रमाणपत्रे दिली जाणार आहे.
राज्य सरकारचा जीआर (Maharashtra Government GR For Maratha Aarakshan)
ऐतिहासिक कागदपत्र
सरकारने हैदराबाद गॅझेटिअरमधील सन १९२१ आणि १९३१ मधील नोंदणी विचारात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कुणबी या जातीचा उल्लेख कापू या नावाने केला जातो. याचाच अर्थ असा की, ज्या नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओळखण्यासाठी हा सोपा मार्ग आहे.
समित्या स्थापन करणार
कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी गावागावात तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा? (How To Apply For Kunabi Certificate)
ज्या मराठा व्यक्तींकडे शेत जमिनीचा मालकी पुरावा नाही, त्यांनी १३ ऑक्टोबर १९७५ पूर्वी किंवा त्याआधी ते त्या स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचे प्रतिणापत्र सादर करणे गरजेचे आहे.
यानंतर याबाबत अधिकारी चौकशी करतील.
या चौकशीत जर अर्जदाराला गावातील किंवा कुळातील एखाद्या नातेसंबंधातील व्यक्तीशी संबंध असेल अन् त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.