DGP Rajnish Seth Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : राज्यभरात राज्यात १३९ गुन्हे दाखल; ३ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद: पोलीस महासंचालक रजनीश सेठ

DGP Rajnish Seth: राज्यात मराठा आरक्षण विविध ठिकाणी आंदोलनं झाली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले.

Bharat Jadhav

(सुरज सावंत )

Director General of Police Rajnish Seth Press Conference:

मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसेचं वळण लागलं. मराठा आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून कुठे कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली. (Latest News)

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाली आहेत. काही ठिकाणी आंदोलनं शांततेत पार पडली आहेत. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांकडून काही ठिकाणी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलं. तर काही ठिकाणी जाळपोळच्या घटना घडल्या आहेत. अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून काही आरोपींना अटकदेखील केलीय, असं पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्या ठिकाण सर्वाजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय. संपूर्ण राज्यात अंदाजे १२ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय. ज्या घटकांना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ दिलेलं आहे. आतापर्यंत १७ एसआरपीएफच्या कंपनी वेगवेगळ्या घटने ठिकाणी दिल्यात.

तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सची कंपनी बीड जिल्ह्यात दाखल झालीय. सात हजार होमगार्ड तैनात करण्यात आल्याची माहिती रजनीश शेठ यांनी दिली. आतापर्यंत संभाजीनगर परिक्षेत्रात २९ ते ३१ ऑक्टोबरच्या दरम्यान घडलेल्या घटनांमध्ये ५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर १०६ आरोपींना अटक करण्यात आलीय.

यात बीड जिल्ह्यात २० गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यातील ७ गुन्हे कलम ३०६ अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय.

बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. तसेच बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद आहे. राज्यात २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान एकूण १४१ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १६८ आरोपींना अटक केली आहे. यासह १४६ आरोपींना कलम ४१ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे, असं रजनीश शेठ यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT