Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : थोड्या दिवसाचा पाहुणा, कधी जाईन माहित नाही, मनोज जरांगे भावुक

Manoj Jarange Nashik News : नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समजाला भावनिक आवाहन केलेय. शरीर साथ देत नाही, मी कधी जाईन माहित नाही, असे वक्तव्य जरांगे यांनी केलेय.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Nashik News : मी सलाईन तोडून आलोय, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती माझ्या समाजाचा लढा एवढ्यावेळी अर्धवट राहू नये आरक्षणापासून ते लांब राहू नये, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सर्व जण एका जागी ताकदीने उपोषणाला बसून एकदाचा आरक्षणाचा तुकडा पाडूयात. माझ्या शरीरात इतक्या वेदना होतात की माझे शरीर मला साथ देत नाही. फक्त मायबाप मराठ्यांची ताकद वाढावी बळ वाढलं पाहिजे म्हणून धीर धरून लढतोय, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

- माझ्यावर अनेक बंधनं आहेत

- मी आदर्श आचारसंहितेचे पालन करतोय.

- महाराष्ट्र सदन खाल्लं, त्यांना काही होत नाही ( भुजबळांना टोला )

- मी सगळ्यांच्या डोळ्यात खूपतो आहे

- समाजाच्या न्यायासाठी लढतोय

- आज येवलेकरांची एकजूट बघून संपूर्ण महाराष्ट्र रात्रभर झोपणार नाही

- मला मागे बघायची सवय नाही, मी येवल्याचा थोडीच आहे

- मी काय बघायचं ते थेट पुढूनच पाहतो

- परिस्थितीने जरी मराठा घेरला, तरी तुम्हाला एक दोन काम सांगतोय तेवढं करा

- मराठा बलाढ्य असल्यामुळे कोणत्याही पक्षात तुम्ही काम करा

- पण मतदानाच्या दिवशी जातवान आणि खानदानी मराठ्यांना आणि आरक्षणाच्या बाजूने मतदान करा

- प्रत्येक पक्षात मराठा असणारा कोणाचाही कार्यकर्ता असला, त्याच्या अडचणीमुळे जरी तो इकडे तिकडे असला तरी मतदान केंद्रावर गेल्यावर डोळे झाकून फक्त आपली मुलं, आपली जात आणि आरक्षण आणा

- तिथे आपला शेतकरी डोळ्यासमोर आणा, ( मतदान केंद्रात ) तिथे काही कळत नाही

- आज जात संकटात सापडली आहे

- या लासलगावमधून मी राज्यातल्या मराठ्यांना हात जोडून सांगतो

- सगळ्या क्षेत्रातला मराठा समाज आता कदरलाय

- राजकारणातला देखील मराठा आता कदरलाय

- ज्या सरकारनं आपल्याला वेठीस धरला त्याला डोळ्यासमोर ठेवायचं आणि शंभर टक्के मतदान करायचं

- आपल्यासोबत ओबीसी, धनगर, मुस्लिम सर्वच आहेत

- पाडापाडी सुरू झाली तर मागच्यावेळी 29 गेले

- जर मुसलमान आणि मराठे या उठावात शहाणे झाले नाही, तर मुस्लिमांनी फक्त केळी विकायची आणि मराठ्यानी फक्त ऊसच विकायचे

- पाव विकायला, केळी विकायला मुसलमान

- आणि केली आणून द्यायला मराठा

- जर तुम्हाला सुधारायचे असेल तर यावेळी कोणीच मागे पुढे पाहायचं नाही, हेवे दावे पाहायचे नाहीत

- एक पण मराठा, मुस्लिम घरी नाही राहिला पाहिजे 100% मतदान करायचं

- मी कुणाला पाडा म्हटलो नाही, मी कुणाच नाव घेतलेलं नाही

- मी घाणीचं नावच घेत नसतो

- एखाद्या पवित्र शहराच्या नावाला का डाग लावायचा?कुणाचं तरी नाव घेऊ

- ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा

- मतदान तुमचं, मालक पण तुम्हीच

- मी कधी फुटणार नाही, कधीच मॅनेज होणार नाही

- आता पुन्हा सामूहिक आमरण उपोषण ठेवलंय

- महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवालीमध्ये येणार आहेत

- आता गावागावात उपोषण करायचं नाही

- कुणाचही सरकार येऊ दे, आता मी सरकारचं डोकंच बंद पाडतो

- मी कुणाच्याही बापाला घाबरत नसतो

- आता आपल्याला आरक्षणाचा तुकडाच पाडायचा आहे

- अर्धे लोक शेतीसाठी घरी ठेवा

- एकदाच आता आरक्षण घ्यायचंय, त्यामुळे सगळेच या

- तुमची गर्दी पाहून तुम्ही निवडणुकीत देखील गेमच करणार असं दिसतंय

- मला प्रचंड वेदना आहेत, सारख्या सलाईन आहेत

- मी सलाईन तोडून आलोय, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे

- माझं शरीर मला साथ देत नाही

- माझी तुम्हाला हात जोडून विनंती माझ्या समाजाचा लढा एवढ्यावेळी अर्धवट राहू नये आरक्षणापासून ते लांब राहू नये

- सर्व जण एका जागी ताकतीने उपोषणाला बसून एकदाचा आरक्षणाचा तुकडा पाडू

- माझ्या शरीरात इतक्या वेदना होतात की माझे शरीर मला साथ देत नाही

- फक्त मायबाप मराठ्यांची ताकद वाढावी बळ वाढलं पाहिजे म्हणून धीर धरून लढतोय

- मी सरकारकडून कधीही मॅनेज होत नाही

- माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुम्ही

- माझा अंतिम कुटुंब म्हणजे माझा मराठा समाज

- राजकारणासाठी या समाजाची एकजूट फुटू देऊ नका

- हे फक्त चार दिवसांचा राजकारण, यापुढे कोणता नेता आपल्याला विचारणार नाही

- कोणता नेता किंवा कोणता पक्ष आपल्याला आधार द्यायला, कोणीही येणार नाही

- कोणीही आडवा आला तर सोडायचं नाही, आरक्षणापासून हटू नका

- माझी जात कधीच तुटू देऊ नका, तुमचा खांद्यावर ही जबाबदारी

- मी कधी जाईल माहित नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील, मला माहित नाही, कारण शरीर कधी धोका देईल हे सांगता येत नाही

- माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी वाटते

- तुम्हाला जे करायचं ते करा, मी कायम तुमच्या पाठीशी

- आपली जात काहीही करून एकजूट ठेवा आणि आरक्षणाला विरोध करणारे जेवढे कुणी महाराष्ट्रात असतील ते पुन्हा कधीच उभे नाही राहिले पाहिजे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राज्यभरात आज प्रचाराचा सुपर संडे

Shani Gochar: शनी मिथून राशीत मार्गी; या ३ राशींसाठी शनीची सरळ चाल देणार मोठे लाभ!

Super Star Pavan Kalyan News : आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून जोरदार भाषण | VIDEO

Washim Accident: एसटी बस -दुचाकीची समोरासमोर धडक, २ जण ठार

Sambhajinagar News : बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्या एकास घेतले ताब्यात; १३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

SCROLL FOR NEXT