Jalna Maratha Andolan News Saam TV
महाराष्ट्र

Jalna News: आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलकाने संपवलं जीवन; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Ambad Taluka News: जालना जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरक्षणाची मागणी करत एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna Maratha Reservation News

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. अशातच जालना जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरक्षणाची मागणी करत एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संदिपान आनंदराव चौधरी (वय ४१ वर्ष) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. संदिपान हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिकनगावाचे रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून चौधरी हे मराठा आंदोलनात (Maratha Reservation) सहभागी होते. शनिवारी (१७ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास त्यांनी वडाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

संदिपान यांच्या निधनाने संपूर्ण अंबड शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदिपान हे पहिल्या दिवसापासून मराठा आंदोलनात सक्रिय होते. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी चालढकल होत असल्याने ते नैराश्यात गेले होते. (Latest Marathi News)

राज्य सरकार मराठा समाजावर अन्याय करत असल्याची खंत त्यांनी आपल्या मित्रांकडे व्यक्त केली होती. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास संदिपान यांनी चिकनगावातील लोणार भायगाव शिवार गट न. 59 मध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या रुमालावर एक मराठा लाख मराठा असं वाक्य लिहून ठेवलं.

दरम्यान, संदिपान यांच्या आत्महत्येची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती पोलीस पाटील आणि सरपंच यांनी अंबड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू केला. संदिपान यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT