Laxman Hake On Jarange Saam Digital
महाराष्ट्र

Laxman Hake: 'विधानसभेला फक्त ५ उमेदवार उभे करुन दाखवा', लक्ष्मण हाकेंचे मनोज जरांगेंना थेट आव्हान; धनंजय मुंडेंवर निशाणा!

Maratha- OBC Reservation: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. अशातच आता लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंना आव्हान देत विधानसभेला उमेदवार उभे करुन दाखवा, असे म्हणत निवडणुकीआधी दंड थोपटले आहेत.

Gangappa Pujari

महेंद्र वानखेडे, ता. ११ सप्टेंबर

Laxman Hake ON Manoj Jarange Patil: राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवले असतानाच ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनीही जरांगे पाटलांना थेट आव्हान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. अशातच आता लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंना आव्हान देत विधानसभेला उमेदवार उभे करुन दाखवा, असे म्हणत निवडणुकीआधी दंड थोपटले आहेत.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

"ही सरळसरळ नौटंकी आहे. विधानसभेमध्ये पोलेरायझेशन करणं आणि निवडणुका जिंकणे. ह्याला पाडा त्याला पाडा याशिवाय जरांगेंनी काही केलं नाही. जरांगेना ओबीसी माहित नाही, जरांगेला काही माहित नाही म्हणून त्यांच्याकडे मी काही अपेक्षा करत नाही. ओबीसीला न्याय कसा मिळेल यासाठी हा लढा आहे. उठ सूट उपोषण, संवाद साधला पाहिजे,च र्चा करा, मी म्हटलं तुला काही येत नाही दुसऱ्यांना बोलवा, पण तेही करत नाही. तसेच पृथ्वीराज बाबा असू दे किंवा एकनाथ शिंदे असू दे, ज्यांना आम्ही खासदार केलं त्यांनी तेही त्यांना सपोर्ट करत आहेत.," असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी नाराजी व्यक्त केली.

विधानसभेला आव्हान...

"जरांगे ज्या ज्या माणसाच्या सांगण्यावर चालतात किंवा जे जे माणसे पैसे त्यांना पुरवतात त्या माणसांनी ओबीसींना पाडण्याचा ठरवले आहे. त्यामुळे आव्हानाला प्रतिआव्हान हे मिळत राहणार, ही लढाई सुरूच राहणार आहे. जरांगेंनी फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाच ठिकाणी उमेदवार उभे करून दाखवावे. जिथे ते आंदोलन करत आहेत त्या अंतरवाली सराटीला तिथेच उमेदवार द्यावा, असे आव्हान देत ओबीसी नेत्यांना पाडण्यासाठी आव्हान करणार आहे ओबीसी समाज आता तर जागे व्हा," असेही लक्ष्मण हाके म्हणाले.

धनंज मुंडेंवर निशाणा...

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीवरुनही लक्ष्मण हाके यांनी नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगेंना लोक रात्रीच का भेटतात? याबाबत जाहीररित्या त्यांनी सांगितलं पाहिजे कारण,आम्हालाही समजला पाहिजे. तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे, जरांगेकडे तुम्हाला का जावं लागतं, कोण आहे जरांगे? जो माणूस संविधानाच्या विरोधात आहे, ओबीसींची घरे जाळल्यासाठी सांगतो, ओबीसींना मतदान नाही करायचा म्हणतो, त्यांची भेट कशाला? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महत्त्वाची बातमी! भुसावळ विभागातील सर्व रेल्वे पॅसेंजर गुरूवारी रद्द, अनेक एक्सप्रेस धावणार २ तास उशिराने

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॉमन मॅन, त्यांना कोणीही डिस्टर्ब करू शकत नाहीत - मंत्री प्रकाश आबिटकर

Sweet Potato Chips: उपवासाला बनवा रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स; रेसिपी लगेच नोट करा

Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

SCROLL FOR NEXT