Manoj Jarange Patil on Maratha Morcha in Mumbai Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Morcha in Mumbai : मुंबईत धडकणार भगवं वादळ? सरकारला इशारा देत जरांगे पाटील म्हणाले...

Maratha Reservation News : मराठा आंदोलक पुन्हा एकदा भव्य मराठा मोर्चा काढत मुंबईत धडकू शकतात, याचे संकेत आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. जालना येथे झालेल्या सभेत त्यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

Satish Kengar

Manoj Jarange Patil on Maratha Morcha in Mumbai :

मराठा आंदोलक पुन्हा एकदा भव्य मराठा मोर्चा काढत मुंबईत धडकू शकतात, याचे संकेत आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. जालना येथे झालेल्या सभेत त्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''17 डिसेंबरला मराठा समाजाची होणार बैठक होणार आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार. ही बैठक आंतरवाली सराटी येथे होणार आहे. आम्ही मुंबईला येणार आणि सर्वकाही बघणार.''

ते म्हणाले, ''मुंबईत आमच्या भाकरी घेऊन येणार मात्र कांदा सोडून. फक्त बाथरूमची व्यवस्था करा. आमच्या जातीच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाणार. मी म्हटलं तर मुंबईत दोन कोटी मराठे येतील. आम्हाला मुंबईला यायचं नाही, मात्र तुम्ही आमच्याशी दगाफटका करू नका.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे म्हणाले, ''32 लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलंय. 24 डिसेंबरला सगळ्यांना प्रमाणपत्र मिळेल, त्याच्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही.'' (Latest Marathi News)

छगन भुजबळ यांना लक्ष्य करत जरांगे पाटील म्हणाले, तुम्हाला जाहीर सांगतो. आम्हाला मराठ्यांना केस पडून काही होत नाही. आम्ही विसरलो नाहीत, माझ्या आईला मार लागलेला आहे, मातामाऊल्यांना मार लागलेला आहे. याचा हिशोब होणार. तुम्ही आमचा अंत पाहू नका, असंही ते म्हणाले आहेत.

जरांगे पाटील या सभेत म्हणाले आहेत की, ''दबावामुळे मराठ्यांचे आरक्षण मिळाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती आहे, याच्या दबावात येऊन तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर, गाठ मराठ्यांशी आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT