Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेच मुख्यमंत्री होणार; CM पदाची चर्चा सुरू असतानाच नव्या दाव्यानं राजकीय 'वादळ'

Maratha Reservation, Manoj Jarange Patil: जरांगे पाटील शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्यानंतर राजगुरुनगर येथे जाहीर सभेतून मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Reservation :

मनोज जरांगे पाटलांच वादळ आता पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकणार असून या वादळाचे धक्के प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा देतानाच मनोज जरांगे पाटीलच राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.

पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला नाही, तर मराठ्यांचा बालेकिल्ला असल्याचं मतही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केलं. जरांगे पाटील शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर राजगुरुनगर येथे जाहीर सभेतून मराठा समाजाला संबोधित करणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू असं म्हटलं होतं. पुण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लागले होते. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदाची संधी असूनही ही संधी गमावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामतीत सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुणे जिल्हा पवारांचा बालेकिल्ला नसून मराठ्यांचा आहे. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री हे मनोज जरांगे पाटील असतील असं म्हणत थेट अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. दरम्यान समन्वयकांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT