Manoj jarange Health News  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज एकवटला; सरकारविरोधात तुफान घोषणाबाजी, जालन्यात काय घडतंय?

Antarwali Sarati News: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचं कळताच मराठवाड्यातील मराठा समाज अंतरवाली सराटी गावात एकवटला आहे. जरांगे पाटील पाणी प्या, उपोषण मागे घ्या, अशी विनंती मराठा बांधव करीत आहेत.

Satish Daud

Manoj jarange Health News

राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करून मराठा समाजाला न्याय द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचारासाठी नकार दिलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खालावल्याचं कळताच मराठवाड्यातील मराठा समाज अंतरवाली सराटी गावात एकवटला आहे. जरांगे पाटील पाणी प्या, उपोषण मागे घ्या, अशी विनंती मराठा बांधव करीत आहेत. मराठा भगिणी देखील जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनवणी करीत आहेत.

मात्र, तरी देखील मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. जरांगेंची प्रकृती पाहून मराठा आंदोलकांना अश्रू अनावर झाले. यावेळी मराठा बांधवांनी आमदार, खासदार तसेच राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करत आहेत. (Latest Crime News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून रास्तारोको आंदोलन सुरू करत संभाजीनगर-जळगाव महामार्ग अडवला आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून शेकडो वाहने अडकली आहेत.

फुलंब्री तालुक्यातील मराठा आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. दरम्यान, वडोद बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana : आधी अत्याचार अन् नंतर हत्या ; नदीत आढळला १७ वर्षीय गतिमंद तरुणीचा विवस्त्र मृतदेह

Maharashtra Live News Update: लव जिहाद कायदा झालाच पाहिजे - आमदार संग्राम जगताप

Rashmika-Vijay Wedding: 'Virosh'ची लगीनघाई...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरमध्ये पोहोचले, पाहा VIDEO

Flying Flea C6 Bike: आली रे आली! Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक आली, आत्ताच बजेटचा करा प्ल‍ॅन

Bakuli Haar Designs: महाराष्ट्राचा अस्सल पारंपारिक दागिना 'बकुळी हार', लेटेस्ट 5 डिझाईन्स कोणत्या?

SCROLL FOR NEXT