Ratnakar Gutte Saam Tv
महाराष्ट्र

Ratnakar Gutte : रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा मराठा आंदोलनाचा फटका; कीर्तनाच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं

Ratnakar Gutte : चार दिवसांपूर्वी आंदोलकांनी आमदार गुट्टे यांना एका उद्धाटन कार्यक्रमात जाण्यापासून रोखलं होतं.

राजेश काटकर

Ratnakar Gutte :

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे. परभणीमधील मराठा बांधवांनी रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांची गाडी अडवून त्याना गावात येण्यास मज्जाव केला. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. (Latest News)

चार दिवसांपूर्वी आंदोलकांनी आमदार गुट्टे यांना एका उद्धाटन कार्यक्रमात जाण्यापासून रोखलं होतं. आज त्यांना गंगाखेड तालुक्यातील पडेगावात जाण्यापासून रोखलं आमदार रत्नाकर गुट्टे हे परभणी तालुक्यातील पडेगावात एका कीर्तनाच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी मराठा बांधवानी त्यांची गाडी अडवली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षण आंदोलनाचा पुन्हा एकदा फटका रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना बसला. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत गावातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना गावाच्या बाहेरच अडवण्यात आले. गंगाखेड येथील पडेगावमध्ये संत मोतीराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले होते.

यानिमित्ताने कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रत्नाकर गुट्टे हे पडेगावला येत होते. त्यावेळी पडेगावमधील मराठा बांधवांनी त्यांना गावाच्या बाहेर अडवले. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात बंदी आहे. तुम्ही गावात येऊ नका, असे म्हणत मराठा बांधवांनी त्यांना तिथूनच परत पाठवले.

पेडगावातील कीर्तन कार्यक्रमात जाऊ द्यावे यासाठी त्यांनी मराठा बांधवांकडे विनंती केली. परंतु नागरिकांनी त्यांना गावात येण्याची परवानगी दिली नाही. दिवाळीच्या निमित्त लोकप्रतिनिधींना लोकांच्या भेट घ्यावी लागते. मराठा समाजाने काही कार्यक्रमातून नेत्यांना गावात येणे वगळावं. काही कार्यक्रमाला येऊ द्यावं, अशी विनंती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली. मात्र तरीही गावकऱ्यांनी त्यांची विनंती ऐकली नाही.

दरम्यान मनोज जरांगे-पाटील यांनी परत एकदा आंदोलनाचा एल्गार उगारलाय. मनोज जरांगे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. तत्पूर्वी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे त्यांनी सांगितलं. मी कुटुंबीयांसोबत बोललो नाही, कदाचित माझं कुटुंब ही दिवाळी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT