Sambhajinagar News  Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : संभाजीनगरात मराठा समाज आक्रमक; रास्ता रोको दरम्यान आंदोलक पोलिसांमध्ये बाचाबाची

Sambhajinagar News : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा; यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये देखील मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 
संभाजीनगर
: छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. शहरातील (Sambhajinagar) क्रांती चौकात मराठा समाज बांधवांतर्फे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी (Police) पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहण्यास मिळाले. (Live Marathi News)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा; यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने (Maratha Aarkshan) आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये देखील मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी रोखल्याने आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहण्यास मिळाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निदर्शने करत घोषणाबाजी 

गेल्या दीड ते दोन तासापासून मराठा समाज बांधव हे क्रांती चौकात घोषणाबाजी करत असून जोरदार निदर्शने करत आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात असून काहीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. तरीही मराठा समाजातील महिला बांधव घोषणाबाजी करत आहे. दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी धरपकड देखील केल्याचं चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ विजयानंतर सतेज पाटील यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी उचलून घेत केलं अभिनंदन

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'

Sleep Problems: काही लोक अंथरुणात पडताच गाढ झोपतात, पण काहींना झोपच लागत नाही, कारण...?

CNG Rates Today : सर्वसामान्यांना महागाईचा फटका! CNG च्या दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार? वाचा

India Bloc Rally: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, दिल्लीत आज महामोर्चा; रामलीला मैदानाला छावणीचे स्वरूप, १०००० पोलिस तैनात

SCROLL FOR NEXT