Maratha Aarakshan Andolan Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan Andolan: थेट मोबाईल टॉवरवर चढून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा; आरक्षणासाठी ५० वर्षीय व्यक्तीचं आंदोलन

Jalna News: गेल्या तासाभरापासून ही व्यक्ती या टॉवरवर आंदोलन करत आहेत.

Ruchika Jadhav

Jalna:

मराठा आरक्षणासाठी अजून नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे. आरक्षण मिळावे यासाठी आज एका व्यक्तीने थेट मोबाईट टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. गेल्या तासाभरापासून ही व्यक्ती या टॉवरवर आंदोलन करत आहेत. यामुळे गावात एकच खळबळ उडालीये. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाच्या मागणीचे लोन आता गावागावात पसरायला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणाऱ्या मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आंदोलन सुरू आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावातील 50 वर्षीय तुळशीराम श्रीपत शेळके यांनी आंदोलनाला सुरूवात केलीये. सकाळी नऊ वाजल्यापासून गावातील मोबाईल टावरवर चढून बसले आहेत. मोबाईल टॉवरवरून त्यांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

तुळशीराम शेळके हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यासाठी हे आंदोलन सुरु केलं आहे. शेळके हे गेल्या एक तासापासून या मोबाईल टावरवर चढून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phaltan Tourism: नयनरम्य निसर्ग अन् थंड ठिकाण... फलटणपासून फक्त 50 किमीवर वसलेत 'हे' सुंदर Hidden स्पॉट्स, एकदा पाहाच

Bhandara News: भंडारा नगरपरिषदेत २०० कोटींचा भ्रष्टाचार; परिणय फुकेंचा गंभीर आरोप|VIDEO

घरात पालींचा सुळसुळाट? फक्त १ रूपयाची 'ही' गोष्ट; मिनिटात पाली होतील गायब

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर काढला; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT