Maratha Reservation News Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation News: ...तर तीन तिघाडी सरकारला सोडणार नाही; जरांगेंसाठी विद्यार्थिनीचा सरकारला इशारा

Student's Warning to Government: "आमचा छत्रपती लढतोय त्याला जर काही झालं तर या तीन तिघाडी सरकारला सोडणार नाही.", असा इशारा विद्यार्थिनीने सरकारला दिला आहे.

Ruchika Jadhav

लक्ष्मण सोळुंके

Maratha Aarakshan:

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी सरकारला यासाठी २० तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. उपोषणामुळे दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटलांची प्रकृती जास्त खालावली होती. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मराठा बांधवांनी आक्रमक भूमीका घेतल्या. अशात आता एका विद्यार्थिनेने देखील आक्रमकपणे थेट सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा ९ वा दिवस आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातून महिलांसह विद्यार्थी दाखल होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या ठिकाणाहून आलेल्या एका विद्यार्थिनीने थेट सरकारला इशारा दिलाय.

विद्यार्थिनीने आधी जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली. "आमचा छत्रपती लढतोय त्याला जर काही झालं तर या तीन तिघाडी सरकारला सोडणार नाही.", असा इशारा विद्यार्थिनीने सरकारला दिला आहे. बोलताना या विद्यार्थिनीला आश्रू देखील अनावर झाले होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी रास्तारोको, बससेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच काल एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा देखील संपवली. संदिपान आनंदराव चौधरी (वय ४१ वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. संदिपान हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिकनगावाचे रहिवासी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

SCROLL FOR NEXT