Maratha Aarakshan  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan : बार्शीतील मराठा आंदोलकाची तब्येत ढासळली; 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु

Maratha Reservation : अशात मराठा आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. मात्र सरकारचा हा निर्णय मनोज जरांगे पाटलांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपलं उपोषण सुरूच ठेवलंय.

भूषण अहिरे

Maratha Aarakshan :

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षणासठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केलीये. त्यांना पाठींबा देत मराठा आंदोलक आनंद काशिद यांचे देखील मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. त्यामुळे आज त्यांची तब्येत ढासळलीये.

काशीद यांची प्रकृती ढसाळल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. सलाईन लावले असले तरी आंदोलन स्थळीच त्यांच्यावर उपचार चालू आहेत. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे तोवर माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका उपोषणकर्ते आंनद काशिद यांनी घेतलीय.

अशात मराठा आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. मात्र सरकारचा हा निर्णय मनोज जरांगे पाटलांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपलं उपोषण सुरूच ठेवलंय. तसेच हाताला लावलेलं सलाईन देखील काढून टाकलं आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी सरकारला २१ फेब्रुवारी पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. त्यामुळे आज झालेला निर्णय त्यांना माहिती नसल्याने मराठा समाजाकडून आक्रमक भूमिका घेतल जाण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सगेसोयरेंबाबत आधी अंमलबजावणी करावी, त्यासंबंधीचा कायदा तयार करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र विधानसभेत 'सगेसोयरे'बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उल्लेख केला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत.

राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

SCROLL FOR NEXT