Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Health Update : मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी खालावली; किडनी आणि लिव्हरला सूज

Manoj JArange Patil News : जरांगे यांनी दिवाळी रुग्णालयातच जाणार असल्याचा अंदाज आहे.

डॉ. माधव सावरगावे

Manoj Jarange Patil News :

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी ९ दिवसांनंतर आपलं आमरण उपोषण सोडलं आहे. सर्वपक्षीय विनंतीनंतर त्यांना हा निर्णय घेतला. मात्र उपोषणानंतर आता मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी खालावली आहे. जरांगे यांनी दिवाळी रुग्णालयातच जाणार असल्याचा अंदाज आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होतं त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांची दिवाळी रुग्णालयाच होईल असं दिसतंय. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वेळेच्या तुलनेत त्यांना यावेळी जास्त अशक्तपणा आहे. तसेच वजन देखील जास्त घटलं आहे. लिव्हर आणि किडनीचे पॅरामीटर देखील डिरेंज झाले आहेत. ब्लड प्रेशरही कमी आहे. या दृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तारखेचा घोळ नाही

सरकारने मागितलेली वेळ आणि मनोज जरांगे यांनी दिलेली डेडलाईन यात घोळ असल्याची चर्चा रंगली होती. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, तारखेचा कोणताही घोळ नाही, 24 डिसेंबरच आहे. मी सरसकट मागणी केली होती, त्याच मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Wednesday Horoscope: मकरसंक्रातीला या ४ राशींचं नशीब फळफळणार, कामात बढतीचेही योग; वाचा बुधवारचे राशीभविष्य

KDMC मध्ये २१ उमेदवार बिनविरोध, सत्ताही आमचीच येणार; मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं गणित

saunf jeera water: दिवसाची सुरुवात बडीशेप आणि जीरा पाणी पिऊन करण्याचे काय फायदे आहेत?

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' चुका करू नका, होईल मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT