Manwath To Selu Railway Track Crack Saam TV
महाराष्ट्र

Railway Track Crack: मानवत रोड ते सेलू दरम्यान रेल्वेरूळ तुटला; गँगमनच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

Manwath To Selu Railway Track Crack: सेलू रेल्वेमार्गावरील मानवतरोड ते सेलू स्थानकाच्या दरम्यान एक मोठी दुर्घटना होता होता टळली.

साम टिव्ही ब्युरो

Manwath To Selu Railway Track Crack: सेलू रेल्वेमार्गावरील मानवतरोड ते सेलू स्थानकाच्या दरम्यान एक मोठी दुर्घटना होता होता टळली. ढेंगळी पिंपळगावजवळ मार्गावर रेल्वे रुळ तुटला होता, ही बाब लक्षात येताच गँगमनने लोको पायलटला सूचना केली. त्यामुळे ट्रेन काही अंतरावर आधीच थांबवण्यात आली. गँगमन तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

अन्यथा पुढच्या काही तासात रेल्वे रुळ तुटून मोठी घटना घडली असती. मिळालेल्या माहितीनुसार, सेलू मार्गावर मानवतरोड ते सेलू स्थानकाच्या दरम्यान ढेंगळी पिंपळगाव जवळ धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे जात असतांना रेल्वे रुळाचा स्लीपरचा एक भाग तुटल्याचे गँगमनच्या लक्षात आले.

सतर्कता दाखवत गँगमनने ट्रेनला रेड सिग्नल दिला. त्यामुळे मोटारमनने ट्रेन काही अंतरावर आधीच थांबवली. ही घटना बुधवारी (ता.१९) रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नाही.

रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच मदत कार्य करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी येत असल्याचे समजते. रेल्वे रुळाच्या एक स्लीपर कशामुळे तुटला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे तसेच परभणीकडून जालन्याकडे जाणाऱ्या रेल्वेच्या काही फेऱ्या विलंबाने धावत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT