narhari zirwal saam tv
महाराष्ट्र

Mantralaya Bribery Case: मंत्रिपद कुणाला द्यायचं अन् कुणाचं काढायचं? मुख्यमंत्री ठरवतील; राजीनाम्यावर झिरवाळ स्पष्टच बोलले

mantralaya bribery case latest updates Maharashtra : मंत्रालयातील लाच प्रकरणात लिपिक रंगेहाथ पकडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नरहरी झिरवाळ यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Namdeo Kumbhar

Narhari Zirwal reaction on clerk bribery raid : १२ तारखेला पडलेल्या धाडीत क्लार्कला रंगेहाथ पकडले. या लाचखोर प्रकरणाची मला कल्पना नव्हती. पण मंत्रालयातील हा घडलेला प्रकार कलंकीत करणारा आहे. मंत्रालयातील लाचखोर प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलीस उपायुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात सखोल चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत माझी अद्याप चर्चा झालेली नाही. पण बोलणार आहे.

मंत्रिपद काढणं हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. माझं काम किती चांगले आहे, ते मुख्यमंत्री पाहतात. मंत्रालयातील धाडीमागे मुख्यमंत्री असतील असे मला वाटत नाही. कुणाही जाणीवपूर्वक कारवाई करेल असे मला वाटत नाही. माझ्या बादनामीसाठी कारवाई झालेली आहे, असे मला वाटत नाही. माझ्या बदनामीचा कुणी प्रयत्न करेल असे मला वाटत नाही. या प्रकरणातील दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मी काही चुकीचं करणार नाही, हे सर्वांना माहिती आहे, असे झिरवाळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाचा विषय सध्या थांबला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. सुप्रिया सुळे यांनी झिरवाळ यांच्या कार्यालयातील धाडीवर महायुतीवर शंका उपस्थित केली होती. त्यालाही झिरवाळ यांनी उत्तर दिले. मला कुणी जाणूनबुजून टार्गेट करेल असे वाटत नाही. माझ्या बदनामीसाठी कुणी प्रयत्न करेल, यावर मला शंका नाही. असे काही असेल असे मला वाटत नाही, असे झिरवाळ म्हणाले.

मंत्रालयात अर्धवट प्रक्रिया केलेल्या फाइल्स आणून बळजबरीने सह्या घेतल्या जातात का? असं काही घडलंय का विचारलं असता मंत्री झिरवाळ म्हणाले की, फाइल बळजबरीने समोर आणून सह्या केल्याचं घडलं नाहीय. स्टे देणं, निलंबन करणं, शहानिशा करून दिलासा देण्याची प्रक्रिया होती. सह्या करून द्या, प्रक्रिया नंतर करू असं कधीच नाही झालंय. जाब जबाब करूनच कार्यवाही केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT