- चेतन व्यास
Wardha News : गावात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पिठाला आटा चक्कीमधून दळून आणलं जातं. पण हेच दळण गावकऱ्यांना वर्षभर मोफत मिळत असेल तर पर्वणीच म्हणावी लागेल. गावाला निशुल्क दळण दळून मिळण्याची ही संधी मनसावळी (Mansavali Grampanchayat) या वर्धा (wardha) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने उपलब्ध केली आहे. (Maharashtra News)
गावकऱ्यांना मोफत दळण दळून जर पाहिजे असेल तर मात्र ग्रामपंचायतीला शंभर टक्के कर भरणा करणे अत्यावश्यक आहे. या अटीवरच गावात ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन उभारलेल्या आटा चक्कीवर मोफत दळण दिले जात आहे.
गावाच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी कर रुपात उभा केला जातो, पण अलीकडे कर भरण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने मनसावळी ग्रामपंचायतीने शंभर टक्के कर भरा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या ! ही संकल्पना सुरू केली आहे.
ग्रामपंचायतीच्या या संकल्पनेचा गावाला फायदा देखील व्हायला लागला आहे. नागरिक आपला घर व पाण्याचा टॅक्स भरून आपली जबाबदारी पूर्ण करू लागले आहेत. घर कराची पावती आटा चक्कीवर दाखवायची आणि आपले गहू, ज्वारी, बाजरी, डाळ आदी धान्य दळून न्यायचे, असाच नित्यनियम गावकरी पाळताना दिसत आहेत.
1200 लोकसंख्या असलेल्या मनसावळी या गावात 2021-22 मध्ये 1 लाख 50 हजार इतकी कर वसुली झाली होती. तर 2022-33 मध्ये 1 लाख 90 हजार इतकी कराची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे.
हिंगणघाट - राळेगाव रस्त्यावर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात उभारण्यात आलेल्या आटा चक्कीतील मोफत दळण योजनेचा आता फायदा नागरिक घेतांना दिसत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.