Manpada Police
Manpada Police Saam Tv
महाराष्ट्र

मानपाडा पोलिसांनी घडवली आई-मुलाची भेट; खाकीतल्या माणुसकीची कहाणी

प्रदीप भणगे

डोंबिवली : सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणारे, माणुसकी नसलेले अशा नजरेतून अनेकजण पोलिसांकडे बघतात, मात्र डोंबिवलीतील एका घटनेमुळे खाकी वर्दीतील कार्यक्षमता आणि वर्दीमधील माणुसकीची दुसरी बाजू समोर आली. मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) डोंबिवलीत (Dombivali) अशी माणुसकी दाखवली आहे की, यामुळे अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय. शहरातील एका हॉटेलसमोर आजी एका बसली होती. या आजीला तिच्या कुटुंबिताली लोकांची नावे सुद्धा सांगता येत नव्हती. ही बाब मानपाडा पोलिसांना समजली आणि त्यांनी 12 तासात या महिलेचे गाव शोधून तिच्या कुटुंबियांचा पत्ता शोधून काढला. पोलिसांनी आजीला तिच्या मुलाकडे स्वाधीन केले.

डोंबिवली पूर्व येथील घरडा सर्कल येथील एका हॉटेल समोर एक आजीबाई जवळ पास २ दिवस रडत बसली होती. हॉटेल मालकाने या आजीबाईच्या जेवणाची सोय केली, मात्र तरीही ती रडतच होती. या आजीबाईला फक्त तिचे नाव आणि जिल्ह्याचे नाव माहित होते. घरातील इतर लोकांची नावे आणि पूर्ण पत्ता आठवत नव्हता. ती फक्त इतकेच सांगत होती की, माझी मुलगी मला घेण्यासाठी येईल. हॉटेल मालकाच्या लक्षात आले की, ही आजीबाई हरविली आहे. त्याने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी त्वरीत पोलीस अधिकाऱ्यांना आजीबाईच्या नातेवाईकांचा पत्ता शोधण्यास सांगितले.

वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस अधिकारी अविनाश वनवे, पोलीस कर्मचारी विजय कोळी, राजेंद्र खिल्लारे, पवार यांनी आजीबाईला विश्वात घेत तिच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. त्वरीत पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना संपर्क केला आणि आजीच्या गावातील लोकांना संपर्क साधून आजीबाईच्या मुलांचा नंबर शोधून काढला. आजीचा मुलगाही संतोष पवार हा त्याच्या आईचा शोध घेत होता. संतोष पवार यांना मानपाडा पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्या आईला त्याच्या स्वाधीन केले.

मुळात या आजीबाई रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मुरडव गावात राहतात. त्यांची मुलगी नवी मुंबईतील कळबोळी येथे राहते. आजीबाईने रत्नागिरीहून कळंबोळीला येण्यासाठी बस पकडली. बस चालकाने तिला कळंबोळी ऐवजी डोंबिवली ऐकून तिला डोंबिवलीत उतरविले. यामुळेच हा घोळ झाला. पोलिसानी अथक प्रयत्न करुन आजीबाईला तिच्या घरांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

SCROLL FOR NEXT