Manoj Jarange- CM Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : 'मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी शपथ चांगली गोष्ट, पण...' मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार

प्रविण वाकचौरे

Jalna News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन काल (२४ ऑक्टोबर) संपली आहे. सरकारने दिलेली वेळ संपल्यानंतर आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणावर बसणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा केली.

याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ही चांगली गोष्ट आहे. पण आंदोलनापासून माघार घेता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा समाज आदर करतो. परंतु आम्ही त्यांचा मान राखत ३० दिवसांऐवजी ४० दिवसांची वेळ दिली होती. आम्ही त्यांना सकारात्मक मानतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र आमच्या लेकरा-बाळांना हक्काचं आरक्षण मिळाल्याशिवाय आम्हाला थांबता येणार नाही. आमच्या मुलांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यासाठी आम्हाला लढावं लागेल आणि आम्ही त्यासाठी लढणार आहोत. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आमच्या भूमिकेपासून आम्ही लांब जाणार नाही, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. (Live Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी शपथ घेतली त्याबाबत आम्ही आदर करतो. मराठा समजाला आरक्षण तुम्हीच देऊ शकता, याबाबत आमच्या मनात काहीही शंका नाही. आता आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी आमचा सन्मान करावा, ही आमची प्रामाणिक मागणी आहे. मुख्यमंत्री शब्दाला पक्के आहेत, असं आम्हाला वाटतं.

आमचा आडमुठेपणा नाही की आरक्षण आताच द्या. मात्र हा वर्षानुवर्षांचा लढा आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन थांबवता येणार नाही. त्यामुळे आम्हाला आरक्षण द्यावं, हीच आमची तुम्हाल कळकळीची विनंती आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना अचानक थांबत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला. मराठा आरक्षण द्यायला मी कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

UPSC चा आणखी एक घोटाळा, मुख्य परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप!

SCROLL FOR NEXT