Manoj Jarange Luxury Defender Car 
महाराष्ट्र

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

Manoj Jarange Luxury Defender Car : मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दीड कोटीच्या कारमधला प्रवास वादात सापडलाय. दीड कोटीची कार जरांगेंची आहे की आणखी कुणाची? या महागड्या गाडीतून जरांगे का आरक्षणाचा दौरा करत आहेत? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट

Rohit Kadam

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टच्या निर्णायक उपोषणापूर्वी राज्यव्यापी दौरा सुरू केलाय. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी जरांगे चक्क कोट्यवधीच्या गाडीतून प्रवास करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारशी लढणाऱ्या जरागेंच्या तब्बल दीड कोटींच्या डिफेंडरची जोरदार चर्चा रंगलीये. डिफेंडरसारख्या लक्झरी कारमधून प्रवास करणाऱ्या जरांगेंवर विरोधकांनी आरोप केलेत. या आरोपांना जरागेंनी काय उत्तर दिलंय ते पाहूयात..

जरांगे प्रवास करत असलेली गाडी...त्यांच्यासोबत असणारा गाड्यांचा भलामोठा ताफा..यावरून यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. मात्र मराठा आंदोलनातले कार्यकर्ते प्रेमापोटी जरांगेंच्या सेवेत सारं उपलब्ध करून देत असल्याचं दावा यापूर्वीही जरांगेंनी केलाय.

मात्र यावेळी जरांगे विरोधत दीड कोटीच्या डिफेंडरवरून जरांगेंना घेरणार का ? याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT