Manoj Jarange Patil Warn Eknath Shinde Devendra Fadnavis Government on Maratha Reservation Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange News: आमच्या संयमाची वाट पाहू नका, अन्यथा... बीडच्या सभेपूर्वी मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

Manoj Jarange Latest News: बीडच्या सभेपूर्वी जरांगे यांनी बीड शहरात जाहीर पत्रकारपरिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

Satish Daud

Manoj Jarange warn to State government

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये 'निर्वाणीचा इशारा' सभा होणार आहे. राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर २४ डिसेंबरनंतरची मराठा आरक्षणाची पुढील दिशा काय असणार, हे या सभेतून ठरवले जाणार आहे. या सभेपूर्वी जरांगे यांनी बीड शहरात जाहीर पत्रकारपरिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आमच्या संयमाची वाट पाहू नका'

सरसकट आरक्षणावर आम्ही ठाम असून आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार, आमच्या संयमाची वाट पाहू नका, असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला (Maratha Reseration) सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत. उपोषण सुरू असताना राज्य सरकारने मला काही शब्द दिले होते. बाकी सर्व माहिती आजच्या सभेत सांगणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे.

जरांगेंची भुजबळांवर बोचरी टीका

मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. भुजबळांच्या मनात मराठ्यांविषयी विष आहे. सरकारला देखील भुजबळ यांच्या एकट्याचीच गरज आहे. त्यामुळे आता त्यांच्या घराशेजारीच तुम्हीही घरं बांधा, असा खोचक टोलाही जरांगे यांनी लगावला.

मराठा समाजाला किती येड्यात काढणार?

सरकारने मागितलेला वेळोवेळी आम्ही वाढवून दिला आहे. तरी सुद्धा मागील दोन महिन्यात सरकारने काहीच केलं नाही. आम्ही सरकारला सांगितले की अभ्यासक वाढवा. त्यावेळी सरकार त्याचं (छगन भुजबळ) ऐकत होते. लोकांना उचलून आतमध्ये टाकले जात होते. तुम्ही मराठा समाजाला किती येड्यात काढणार आहात, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT