Manoj Jarange Saam tv
महाराष्ट्र

Jalna Maratha Andolan : मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार, १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत जाहीर सभा

Jalna News : महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळूनच घ्यायचे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna News :

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच साखळी उपोषण करणारे मनोज पाटील जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळूनच घ्यायचे, यावर एक मताने ठराव पारित करण्यात आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका ही या बैठकीदरम्यान घेण्यात आली. (Latest Marathi News)

याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, सरकारने वेळ मागितला, वेळ देणं अपेक्षित होतं म्हणून दिला. सरकारने एक महिना मागितला होता आम्ही १० दिवस जास्त दिले आहेत. सरकारला दिलेली मुदत १४ तारखेला पूर्ण होत आहे.

त्यापुढे १० जास्तीचे दिले आहेत. त्या काळात त्यांनी आरक्षण द्यावं. यासाठी १४ तारखेला देखील येथे त्यासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे सर्व कार्यक्रम शांततेत होणार आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिकाही घेण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT