Manoj Jarange Patil, Maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

... तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद! मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; शिंदें-फडणवीसांवर सर्वात गंभीर आरोप

Manoj Jarange Patil, Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. १२ सप्टेंबरला आंतरवाली सराटीत बैठकीचे आवाहन करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आणि आंदोलकांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा दिला.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Patil Latest news : मराठ्यांची ही शेवटची लढाई आहे, त्यानुसार प्रत्येकाने तयारी करा. १२ सप्टेंबरला बांदा ते चांदा अशा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांनी कोणतेही कारण न देता आंतरवाली सराटीत बैठकीसाठी उपस्थित राहा, असे थेट आणि आक्रमक आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सरकार मराठ्यांची फसवणूक करत असून, १२ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवून सरकारचा माज उतरवण्यासाठी सर्वांनी मुंबईकडे निघायचे आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार मराठा समाजाची अडवणूक आणि वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत जरांगे यांनी मराठा समाजाला निर्णायक संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडू – जरांगे पाटलांचा थेट इशारा

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुंबईतील आंदोलनादरम्यान जर कोणत्याही एका मराठा आंदोलकाचे डोके फुटले किंवा प्रशासनाने अन्याय केला, तर १० मिनिटांत संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडला जाईल." तसेच मुंबईकडे जात असताना जर सरकारने आंदोलकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर आपापल्या शहरातून जाणारे रस्ते आणि रेल्वे पूर्णपणे बंद पाडण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

राज्य सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले, "मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून प्रचंड निष्काळजीपणा सुरू आहे. हे केवळ शिंदे आणि फडणवीस यांची मिळीभगत असून ते मराठ्यांना फसवण्याचे काम करत आहेत. पोलिसांचा यात काहीही दोष नाही, सर्व दोष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. सरकारच्या या धोरणामुळे मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे."

शांततेत आंदोलन

जर सरकारने मुंबईत जाण्याची परवानगी दिली, तर पूर्णपणे शांततेच्या मार्गाने मुंबईत प्रवेश केला जाईल. पोलिसांनी त्रास दिला तरी त्यांना उलट त्रास द्यायचा नाही. पोलिसांनी अचानक हल्ला केला तर कोणीही घाबरून पळू नये, ज्यामुळे चेंगराचेंगरी होणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

सध्या कोणीही आंतरवालीत गर्दी करू नये. सर्वांनी १२ सप्टेंबरला बैठकीसाठी आंतरवाली सराटीत उपस्थित राहावे. हातातली सर्व कामे बाजूला ठेवून १२ तारखेला आंतरवालीत या. तिथेच मुंबई कूचची अंतिम तारीख आणि पुढची रणनीती ठरवली जाईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी इंदापूर तहसीलदारांना निवेदन...

Kitchen Safety Tips: तुमच्या किचनमध्ये लपलेत आरोग्याचे 3 शत्रू; आजच फेकून द्या कचऱ्यात

जेवणानंतर पोट फुगतं अन् ढेकर येतात; 5 चुका आजच टाळा, आठवड्याभरात फरक पाहा

Maharashtra Government : सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी ४ GR जारी; जाणून घ्या सविस्तर

Best time to eat food: सकाळी काय खावं आणि रात्री काय टाळावं? या पदार्थांची योग्य वेळ जाणून घ्या, आरोग्याला होईल फायदा

SCROLL FOR NEXT