Manoj Jarange Patil Firm On Kunbi Certificate Protest; Government Talks Fail saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: सरकारशी चर्चा निष्फळ ठरताच मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; मराठा समाजालाही केलं आवाहन

Manoj Jarange Patil Big Decision: कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • कुणबी प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

  • सरकारसोबत चर्चा निष्फळ झाल्यानंतर जरांगे पाटलांचा मोठा इशारा

  • आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

सरकारचे शिष्टमंडळाने आज आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. डझनभर प्रतिनिधी सराटीत दाखल झाले. दोन ते तीन तास चर्चेचे गुऱ्हाळं झालं. पण सरकारच्या हाती फार काही लागलं नाही. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धडकी भरवणारी घोषणा केली.

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून आक्रमक झालेल्या जरांगेंनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला. जरांगेंच्या गंभीर इशाऱ्यानंतर आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला.इतकेच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्याचेही मान्य केले.

यासह प्रमाणपत्र देण्यात दिरंगाई होत असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा शब्दही सरकारच्या शिष्टमंडळानं दिलाय. तरीही मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करण्यावर ठाम आहेत.

सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगेंचे प्रश्न

आठवण लाख कुणबी नदी तुम्ही शोधले आहेत, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या, यापूर्वी जे प्रमाणपत्र दिले आहेत. त्याचा डाटा द्या, अशी मागणी करत ज्या बांधवांनी व्हॅलेडीटीसाठी अर्ज केले ते जाणीवपूर्वक रोखून ठेवल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. यासह सातारा, हैदराबादचा जीआर काढला तो खरा काढला की खोटा काढला असा सवालही पाटील यांनी केलाय.

मराठा समाजाला केलं आवाहन

महाराष्ट्रातल्या मराठा समाजातील लोकांनी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. पण कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशा लोकांनी 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत यावे. याचा निपटारा काढायचा आहे. ज्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत पण व्हॅलिडिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला यावे. मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथेच राहायचं मला ते सरकारला दाखवायचेत.

कुणबी प्रमाणपत्र नाहीत, कोणाच्या चुलत्याला दिलीत पण पुतण्याला देत नाहीत. पुतण्याला दिली बहिणीला देत नाहीत तुमचे ते अर्ज घेऊन या तिकडे पण अर्ज करा. अधिकाऱ्यांकडे तहसीलदारकडे एसडीएम कडे तुमचे अर्ज करा. त्या प्रमाणपत्रासाठी आणि मग इकडे सुद्धा एक त्याची झेरक्स कॉपी घेऊन या, असं जरांगे पाटलांनी आवाहन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT