Manoj Jarange Patil addresses media while criticizing Devendra Fadnavis over law and order issues in Maharashtra. 
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस राक्षसी वृत्तीचे, हे सरकार पाडावेच लागेल; मनोज जरांगे पाटलांची आक्रमक टीका

Manoj Jarange Patil statement against Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार पाडण्याची मागणी त्यांनी केली.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, तोपर्यंत राज्यात असेच खून आणि अत्याचार होत राहणार आहेत. फडणवीस यांचे काम राक्षसी वृत्तीने सुरू आहे, त्यामुळे हे सरकार उलथवून लावण्याची गरज आहे, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे पाटील सोमवारी रात्री अकलूज येथील धनाजी साखळकर यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील आत्याचाराच्या घटनेला मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात 'एसी' (AC) आणि मोबाईल पुरवले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. हे आरोपी कोणाच्या आशीर्वादाने चैनीत आहेत, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

भाजपच्या तीन राज्यांतील विजयाबाबत जरांगे पाटील यांनी शंका व्यक्त केली. ते म्हणाले यात काहीतरी 'गडबड' आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव होणे शक्यच नाही, असे तेथील स्थानिक लोक सांगत आहेत. असे असताना भाजपलाच लोक मतदान कसे काय करतात? यामध्ये नक्कीच काहीतरी काळं-बेरं आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT