Prashad lad vs Jarange Patil 
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: एवढं प्रेम आहे तर देवेंद्र फडणवीसांशी लग्न करा; मनोज जरांगे पाटील यांचा भाजप नेते लाड यांना शिव्यांचा 'प्रसाद'

Prashad lad vs Jarange Patil: मनोज जरांगे पाटील हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. जरांगे पाटील यांना देवेंद्र द्वेष आजार झालाय, अशी टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली होती. त्यांच्या टीकेला जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं.

Bharat Jadhav

भाजप नेते प्रसाद लाड यांच्या टीकेला उत्तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली. माझ्या नादी नको पडू, मनोज जरांगे पाटील हा जातीसाठी लढतो. जात विकून घर मोठं करणारी तुमची औलाद असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर केलीय. दरम्यान लाड यांच्यावर जरांगेंनी शिवीगाळ केल्यामुळे प्रसाद लाड आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांना वारंवार लक्ष्य करत असतात. त्यावरुन भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष करत आहेत. जरांगे पाटील यांना डीडी नावाचा रोग झाला असून त्यांना देवेंद्र द्वेष झाल्याची टीका लाड यांनी केली होती.

मराठा आरक्षण मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांना वारंवार लक्ष्य करत असतात. त्यावरुन भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष करत आहेत.जरांगे पाटील यांना डीडी नावाचा रोग झाला असून त्यांना देवेंद्र द्वेष झाल्याची टीका लाड यांनी केली होती. लाड यांच्या टीकेला उत्तर देतांना जरांगे पाटील यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.

अंतरावली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलतना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड, प्रविण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला. परिषदेच्या सुरुवातीलाच जरांगेंनी प्रसाद लाड यांना उत्तर देतांना त्यांना शिवीगाळ केली. प्रसाद लाड हा भंगार नेता आहे, माझ्या नादी लागू नको. माझ्यासमोर लाडी गुलाबी जमत नाही. असे झिगूर मागूर माझ्यासमोर अनेक आलेत. आमच्या गोर गरीब मराठ्यामध्ये ढवळाढवळ त्यांनी करु नये, तुला महागात पडेल, असा दम जरांगे पाटील यांनी लाड यांना दिलाय. प्रसाद लाड हे खरं मराठ्याच्या रक्ताचे असतील त्यांनी फडणवीसांना आरक्षणाची विचारणा करावी, असं जरांगे पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT