manoj jarange patil sabha in satara medha and wai today saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Sabha In Satara: प्रितिसंगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करुन जरांगे-पाटील साता-यास रवाना, आजच्या सभेकडे राजधानीचे लक्ष (पाहा व्हिडिओ)

प्रतापगडावर जरांगे पाटील भवानी मातेचे दर्शन घेणार आहेत.

संभाजी थोरात

Satara News :

मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) प्रयत्नशिल असलेले मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांनी काही वेळापूर्वी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितिसंगमावरील समाधीला अभिवादन केले. त्यानंतर ते साताऱ्याकडे सभेला रवाना झाले. (Maharashtra News)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज (शनिवार) सातारा येथे राजवाडा नजकीच्या गांधी मैदान येथे हाेणा-या सभेत जरांगे पाटील काय बाेलणार याकडे मराठ्यांसह सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

या सभेनंतर जरांगे पाटील यांची मेढा येथे सभा हाेणार आहे. या सभेसाठी सकल मराठा समाजाने जय्यत तयारी केली आहे. याबराेबरच जरांगे पाटील हे प्रतापगडावर जाणार आहेत. तेथे ते श्री भवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी चार वाजता जरांगे पाटील यांची वाई येथे सभा हाेणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या तिन्ही सभा स्थळी भगवे झेंडे, मराठा आरक्षणाच्या मागणीचे फलक उभारण्यात आले आहेत. तिन्ही ठिकाणी सातारा पाेलीसांचा कडेकाेट बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. सभेला येणा-या मराठा समाज बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र मैदानांवर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT