Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Antarwali Sarathi Lathicharge : लाठीचार्जनंतर जरांगे निघून गेलेले, मात्र रोहित पवार, टोपेंनी त्यांना आणून बसवलं', भुजबळ यांचा गंभीर आरोप

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil: अंतरवली सराटीत पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते, मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगे यांना पुन्हा तिथं आणून बसवलं, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

Satish Kengar

अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा आंदोलनाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक दावा केलाय. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते, पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगे यांना पुन्हा तिथं आणून बसवलं असं म्हणत छगन भुजबळ यांनी रोहित पवार आणि राजेश टोपेंवर गंभीर आरोप केलाय,

काय म्हणाले छगन भुजबळ?

मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले आहेत की, ''आंतरवाली सराटीमध्ये दगडफेकीला ज्या वेळेला सुरुवात झाली, लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि राजेश टोपे या दोघांनी त्यांना तिथे परत आणून बसवलं.''

ते म्हणाले, ''शरद पवार साहेबांना तिथे बोलावलं. पवारसाहेब गेले म्हणून उद्धव ठाकरेही तिथे गेले. खरी माहिती ही आहे की, त्या दोघांना कल्पना नव्हती पवार साहेबांना पण आणि उद्धव ठाकरेंना पण इथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे.''

भुजबळ यांच्या आरोपांवर जरांगे यांचं प्रत्युत्तर

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या आरोपांवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''छगन भुजबळ तुम्ही हे काम करू नको, बाकी मी बघतो कोण कुठे होता, कोणी आणून बसवलं. तुमचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करतील.''

मनोज जरांगे पुढे म्हणाले, ''कोणी काय केलं आणि काही नाही, याची चौकशी फडणवीस करतील. फडणवीस हुशार आहेत. यावरच भाष्य करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ''मला ते जास्त माहीत नाही. सरकार म्हणून त्यांच्याकडे जास्त माहिती असेल. लाठीचार्ज केला नसता मनोज जरांगे नावाचा नेता महाराष्ट्राला भेटला नसता.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली, तिघे गंभीर जखमी

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT